राष्ट्रवादी, मनसेच्या कार्यकत्र्याची चौकशी करा
By Admin | Updated: October 17, 2014 01:28 IST2014-10-17T01:28:22+5:302014-10-17T01:28:22+5:30
कळवा-मुंब्रा मतदारसंघातल्या मतदान यंत्रंमध्ये राष्ट्रवादी व मनसेच्या कार्यकत्र्यानी फेरफार केल्याचा संशय शिवसेनेने व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी, मनसेच्या कार्यकत्र्याची चौकशी करा
कळवा : कळवा-मुंब्रा मतदारसंघातल्या मतदान यंत्रंमध्ये राष्ट्रवादी व मनसेच्या कार्यकत्र्यानी फेरफार केल्याचा संशय शिवसेनेने व्यक्त केला आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही आमदार एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
कळव्यातीस सहकार विद्यलयात मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. या शाळेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मिलिंद पाटील आणि मनसेचे उमेदवार महेश साळवी त्यांच्या कार्यकत्र्यासह यांना गुरुवारी मध्यरात्री त्यांच्या बाहेर पडत असल्याचे काही शिवसैनिकांनी पाहिले. त्यामुळे हा आरोप शिवसेनेने केला आह़े
बुधवारी सायंकाळी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील मतदान आटोपल्यानंतर अधिका:यांनी कळवा येथील सहकार विद्यालयामध्ये मतदान यंत्रे ठेवली होती. मात्र, मध्यरात्री राष्ट्रवादीचे नगरसेवक मिलिंद पाटील, जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहायक उदय मोरे, मनसेचे उमेदवार महेश साळवी व त्यांचे आठ-दहा कार्यकर्ते संशयास्पदरीत्या वावरताना आढळले.
त्याचवेळी शिवसेनेचे उमेदवार दशरथ पाटील हेही त्या ठिकाणी गेले असता पोलिसांनी त्यांना अडवले. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकत्र्यामध्ये अस्वस्थता पसरली. मतदान यंत्रंमध्ये राष्ट्रवादी व मनसेच्या कार्यकत्र्यानी फेरफार केल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला. हळूहळू शिवसैनिकांची गर्दी वाढू लागल्याने तणाव निर्माण झाला. ही घटना समजताच शिवसेना नेते आमदार एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
उमेदवारांच्या प्रतिनिधीव्यतिरिक्त अन्य आठ-दहा लोक अनधिकृतपणो या परिसरामध्ये गेले होते. त्यांच्यावर तसेच शिवसेनेच्या उमेदवाराला अडवणा:या पोलीस अधिका:यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
च्या प्रकाराची जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आह़े त्यानुसार, लवकरच चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याचे शिवसेनेचे उमेदवार दशरथ पाटील यांनी सांगितले.
च्मतदान यंत्रे रात्री 11 वाजता स्ट्राँग रूममध्ये ठेवूून त्यांना सील करण्यास निवडणूक निर्णय अधिका:यांनी सर्व उमेदवार व प्रतिनिधींना बोलावले होते. निवडणूक निरीक्षण अधिकारीही उपस्थित होते. इतर पक्षांचे उमेदवार व प्रतिनिधीही हजर होते. शिवसेनेचा एकच प्रतिनिधी हजर होता. कदाचित आम्ही बाहेर गेल्यानंतर, दशरथ पाटील आल्यामुळे त्यांना आत सोडण्यात आले नाही. माङयावरचे आरोप निराधार असून, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मनसे उमेदवार महेश साळवी यांनी सांगितले.