मुंबई-पुणे एक्स्प्रेस टोलवसुलीसंदर्भात केलेल्या आरोपांची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:06 IST2021-03-19T04:06:32+5:302021-03-19T04:06:32+5:30

उच्च न्यायालयाचे कॅगला निर्देश मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोलवसुलीसंदर्भात केलेल्या आरोपांची चौकशी करा उच्च न्यायालयाचे कॅगला निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...

Investigate allegations made regarding Mumbai-Pune Express toll collection | मुंबई-पुणे एक्स्प्रेस टोलवसुलीसंदर्भात केलेल्या आरोपांची चौकशी करा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस टोलवसुलीसंदर्भात केलेल्या आरोपांची चौकशी करा

उच्च न्यायालयाचे कॅगला निर्देश

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोलवसुलीसंदर्भात केलेल्या आरोपांची चौकशी करा

उच्च न्यायालयाचे कॅगला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोलवसुलीसंदर्भात अनियमितता असल्याच्या आरोपाच्या सखोल चौकशीचे निर्देश उच्च न्यायालयाने केंद्रीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांना (कॅग) गुरुवारी दिले.

न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने कॅगला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) बँक खात्यांचे लेखापरीक्षण करण्याचेही निर्देश देत हा अहवाल तीन आठवड्यांत सादर करण्यास सांगितले. तसेच याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपांबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारलाही दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वे टोलवसुलीसंदर्भात दिलेल्या कंत्राटात अनियमितता असून कंत्राटदाराने जादा टोल वसूल करूनही कमी दाखविला आहे, असा आरोप करणाऱ्या चार जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत.

ऑगस्ट २०१९ पासून नागरिकांकडून बेकायदेशीरपणे टोल वसूल कण्यात आला, असे जाहीर करावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.

ऑगस्ट २००४ ते १० ऑगस्ट २०१९ पर्यंत खासगी कंत्राटदाराला ९१८ कोटी रुपये देण्यात आले. टोलवसुलीद्वारे ४,३३० कोटी रुपये महसूल कंत्राटदाराला मिळणे अपेक्षित होते. तथापि, ३१ जुलै २०१९ पर्यंत ६,७७३ कोटी रुपये वसूल झाले. अपेक्षेपेक्षा २,४४३ कोटी रुपये अधिक कमावण्यात आले. दरम्यान, राज्य सरकारने २०३० पर्यंत मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील टोल वसुली कायम ठेवली. प्रकल्पाचा खर्च अद्याप वसूल न झाल्याची सबब देत राज्य सरकारने या एक्स्प्रेस-वेवर टोलवसुली कायम ठेवली.

याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप, त्यावर एमएसआरडीसीने दिलेली उत्तरे व कागदपत्रांची पडताळणी करून तीन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने कॅगला दिले.

Web Title: Investigate allegations made regarding Mumbai-Pune Express toll collection