धारावीतील संक्रमण शिबिरात पुन्हा घुसखोरी

By Admin | Updated: August 30, 2015 02:03 IST2015-08-30T02:03:51+5:302015-08-30T02:03:51+5:30

म्हाडाच्या धारावी येथील संक्रमण शिबिराला दलालांचा विळखा पडला आहे. या शिबिरातील सुमारे १८४ घरांवर दलालांनी ताबा मिळवला असतानाही त्याकडे म्हाडा अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

Intrusion again in Dharavi transit camp | धारावीतील संक्रमण शिबिरात पुन्हा घुसखोरी

धारावीतील संक्रमण शिबिरात पुन्हा घुसखोरी

मुंबई : म्हाडाच्या धारावी येथील संक्रमण शिबिराला दलालांचा विळखा पडला आहे. या शिबिरातील सुमारे १८४ घरांवर दलालांनी ताबा मिळवला असतानाही त्याकडे म्हाडा अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या धारावी शिबिरात म्हाडाने मे महिन्यात धडक कारवाई करत १८ घुसखोरांना गाळ्यातून बाहेर काढले. त्यानंतर हे गाळे सील करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा या गाळ््यांवर दलालांनी ताबा मिळवत येथील घरे भाड्याने दिली होती म्हाडाने पुन्हा या घुसखोरांना घराबाहेर काढले. परंतू पुन्हा दलालांनी इमारत क्रमांक २/सी मधील ५४, ५/ए मधील २0, ६/ए मधील ६४, १/सी २६ आणि १ ए मधील २0 खोल्या टाळे तोडून भाडेकरूना दिल्या आहेत. या शिबिरातील १८४ गाळे दलालांच्या ताब्यात आहेत.
येथील दलाल भाड्यापोटी दरमहा लाखो रुपये उकळत आहेत. तरीही म्हाडामार्फत कारवाई होत नसल्याने दलाल गब्बर होऊ लागले आहेत. संक्रमण शिबिरात घुसखोरी झाली असल्यास घुसखोरांना घराबाहेर काढण्यात येईल, असे आर आर मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांनी सांगितले.

Web Title: Intrusion again in Dharavi transit camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.