Join us
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादी, आरपीआय, एमआयएमकडून मुलाखतींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 10:59 IST

समाजवादी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी कुलाबा कार्यालयात झाल्या. लवकरच उमेदवारी यादी जाहीर करण्यात येईल, असे प्रदेश सरचिटणीस मेराज सिद्दीकी यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास मंगळवारी प्रारंभ होत असला तरी आम आदमी पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाने उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी समाजवादी पक्ष, रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय आणि एमआयएममध्ये उमेदवारांच्या मुलाखतींना वेग आला आहे. 

समाजवादी पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी कुलाबा कार्यालयात झाल्या. लवकरच उमेदवारी यादी जाहीर करण्यात येईल, असे प्रदेश सरचिटणीस मेराज सिद्दीकी यांनी सांगितले. एमआयएमच्याही इच्छुकांच्या मुलाखती झाल्या असून, ६० जागांवर लढण्याची तयारी असल्याची माहिती एमआयएमचे मुंबई अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी दिली. आरपीआयच्या इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, बाळासाहेब गरूड आदींनी मुलाखती घेतल्या. 

२० जागांची मागणी

गौतम सोनावणे म्हणाले की, ७० मतदारसंघातील इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. आम्ही भाजपकडे १५ ते २० जागा मागितल्या आहेत. याबाबत दोन दिवसांत चर्चा होईल. उमेदवारांनी कोणत्या चिन्हावर लढायचे याचा निर्णय पक्षाध्यक्ष रामदास आठवले व भाजपचे वरिष्ठ नेते घेतील. जागावाटपाबाबत यापूर्वी प्राथमिक बैठक झाली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Samajwadi Party, RPI, MIM Expedite Candidate Interviews for BMC Elections

Web Summary : With BMC elections approaching, Samajwadi Party, RPI, and MIM have accelerated candidate interviews. SP held interviews at its Colaba office, while MIM aims to contest 60 seats. RPI seeks 15-20 seats from BJP, with final decisions pending.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२६महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६