भाजपाने घेतल्या उमेदवारांच्या मुलाखती
By Admin | Updated: March 30, 2015 00:26 IST2015-03-30T00:26:40+5:302015-03-30T00:26:40+5:30
भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या रविवारी मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाच्या वाशी येथील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला

भाजपाने घेतल्या उमेदवारांच्या मुलाखती
नवी मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या रविवारी मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाच्या वाशी येथील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी निवडणूक संयोजक तथा आमदार संजय केळकर, मनोज कोटक व मीरा - भार्इंदरचे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रोहिदास पाटील यांनी मुलाखती घेतल्या. विशेष म्हणजे यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांना मुलाखत प्रक्रियेपासून चार हात लांब ठेवण्यात आले होते.
शिवसेना - भाजपा युतीला दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने मान्यता दिली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर याविषयी चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेने यापूर्वीच आपले बहुतांशी उमेदवार निश्चित केले आहेत.
त्यामुळे भाजपानेही १११ प्रभागांसाठी रविवारी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन आपले उमेदवार निश्चित केले. याप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, प्रदेश सचिव वर्षा भोसले, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सी.व्ही.रेड्डी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)