किणोंच्या मुलाखतीने शिवसेनेत भडका
By Admin | Updated: September 19, 2014 23:15 IST2014-09-19T23:15:43+5:302014-09-19T23:15:43+5:30
एकीकडे ठाणो शहर मतदारसंघासाठी शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी झाली असताना आता कळवा-मुंब्रा मतदारसंघातून काँग्रेसचे राजन किणो यांनी शिवसेनेकडून मुलाखत दिल्याची माहिती पक्षाच्या सूत्रंनी दिली.

किणोंच्या मुलाखतीने शिवसेनेत भडका
अजित मांडके/ कुमार बडदे - ठाणो
एकीकडे ठाणो शहर मतदारसंघासाठी शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी झाली असताना आता कळवा-मुंब्रा मतदारसंघातून काँग्रेसचे राजन किणो यांनी शिवसेनेकडून मुलाखत दिल्याची माहिती पक्षाच्या सूत्रंनी दिली. त्यामुळे येथील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून तिकीट मिळणार, या आशेवर प्रचार सुरू करणा:या इतर इच्छुकांची मात्र हवा निघाली आहे.
2क्क्9 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांना 65,51क् मते मिळाली होती. शिवसेनेचे राजन किणो यांना 45,821 मते मिळाली होती. मनसेच्या प्रशांत पवार यांना 15 हजार 119 मते मिळाली होती. समाजवादी पक्षाचे सुरमे यांना 3,429 आणि बसपाच्या सचिन म्हात्रे यांना 2,756 मते मिळाली होती. परंतु, किणो यांनी पराभवाचे खापर शिवसेनेच्याच काही पदाधिका:यांच्या माथी मारून पक्षाच्या एका बडय़ा पदाधिका:याच्या कानशिलातही त्यांनी लगावली होती. त्यानंतर, त्यांना शिवसेनेतून पायउतार व्हावे लागले. या घटनेनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या तिकिटावर ते नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. परंतु, त्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीत किणो गैरहजर राहून त्यांनी शिवसेनेला छुपा पाठिंबा दिल्याची चर्चा रंगली होती. काँग्रेसने कारवाईचा बडगाही उगारला होता. परंतु, काही महिन्यांनंतर ती मागे घेण्यात आली.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याच मतदारसंघात घेरण्यासाठी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. परंतु, अद्यापही त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला नसताना अचानक शिवसेनेच्या इच्छुकांमध्ये त्यांचा नंबर लागल्याने या ठिकाणी इच्छुक असलेल्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. नुकताच, शिवसेनेने इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम घेतला. यामध्ये कळवा-मुंब्रा मतदारसंघातून दशरथ पाटील आणि सुधीर भगत यांनी मुलाखती दिल्या. परंतु, त्यानंतर किणो यांनीही मुलाखत दिल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रंनी दिली आहे. त्यांना तिकीट मिळालेच तर पुन्हा शिवसेना गद्दारांनाच तिकीट देणार, हे यातून स्पष्ट होणार असून त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक पुन्हा एकदा डावलले जाणार असल्याचे मत काही जाणकार शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे. तसेच याचा मतांवरदेखील परिणाम होऊ शकतो, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आपल्याला तिकीट मिळेल, या आशेवर असलेल्या काही इच्छुकांनी प्रचाराचा नारळसुद्धा फोडला आहे. परंतु, आता किणो यांचे नाव अचानक पुढे आल्याने त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.