आंतरराष्ट्रीय विश्वशांती बौद्ध संमेलन सुरतला

By Admin | Updated: September 7, 2014 01:41 IST2014-09-07T01:41:27+5:302014-09-07T01:41:27+5:30

सुरत येथे विश्वशांती बौध्द परिषदेतर्फे 11 जानेवारी 2क्15 ला आंतरराष्ट्रीय विश्वशांती बौध्द संमेलन पार पडत आहे.

International World Conference on Buddhist Conference Suratla | आंतरराष्ट्रीय विश्वशांती बौद्ध संमेलन सुरतला

आंतरराष्ट्रीय विश्वशांती बौद्ध संमेलन सुरतला

ठाणो : सुरत येथे विश्वशांती बौध्द परिषदेतर्फे 11 जानेवारी 2क्15 ला आंतरराष्ट्रीय विश्वशांती बौध्द संमेलन पार पडत आहे. यासाठी देशभर मोठय़ासंख्येने जनजागृती सुरू असून  सभा, बैठका घेतल्या जात आहेत.
इंटरनॅशनल एक्ङिाबिशन हॉल, सुरत येथे देशभरासह परदेशातील बौध्द धम्माचे कार्यकर्ते मोठय़ासंख्येने उपस्थित  राहणार आहेत. भदन्त राहूल बोधी महाथेरो यांच्या टिळकनगर येथील सर्वोदय बुध्द विहारमध्ये आंबेडकरी अनुयायी बांधवांची सभा नुकतची  पार पडली. खास लंडनहून आलेले या विश्व संमेलनाचे संयोजक गौतम चक्रवर्ती यांनी या संमेलनाची संकल्पना व्यक्त करून अनुयायींचे लक्ष वेधून घेतले. सुमारे 2क्क् कार्यकत्र्याच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. मिलिंद शेजवळ यांनी केले. यावेळी  बुध्दगयेचे भदन्त डॉ. धम्मविर्य महाथेरो, तक्षशीला पंजाबचे बोधी पालो भन्ते, खा. रामदास आठवले, आर.के. गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत  14 ऑक्टोबर  1956 ला नागपूर दीक्षा भूमीवर दीक्षा घेतलेले राजकोट जिल्ह्यातील 1क्5 वर्षाचे भीमा-बाप्पा रावलिया हे  हयात असून ते या विश्व संमेलनाला उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)

 

Web Title: International World Conference on Buddhist Conference Suratla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.