व्हिसलिंग वूड्समध्ये आंतरराष्ट्रीय मीडिया लॅब
By Admin | Updated: August 11, 2015 04:26 IST2015-08-11T04:26:02+5:302015-08-11T04:26:02+5:30
व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल या चित्रपट संस्थेत ‘फॉक्सकॉन मीडिया लॅब’ लॉँच करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक-निर्माते सुभाष घई यांनी केली.

व्हिसलिंग वूड्समध्ये आंतरराष्ट्रीय मीडिया लॅब
मुंबई : व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल या चित्रपट संस्थेत ‘फॉक्सकॉन मीडिया लॅब’ लॉँच करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक-निर्माते सुभाष घई यांनी केली.
फॉक्सकॉन टेक्नोलॉजी ग्रुपच्या निधीतून या लॅबची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपट निर्मितीशी संबंधित विविध अत्याधुनिक साधनसामग्री आणि तंत्रज्ञानाची माहिती या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मीडिया लॅबद्वारे विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. यामुळे साधारणत: सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
‘भारतीय प्रसिद्ध सिनेनिर्माता सुभाष घई यांच्यासोबत जोडल्या गेल्याने फॉक्सकॉन कंपनीला आनंद होत आहे. व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल (डब्ल्यू.डब्ल्यू.आय.)मध्ये विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मितीचे उत्तम मार्गदर्शन मिळत असते. तसेच ही मीडिया लॅब तयार करण्यामागे या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आयडियाजमुळे मी प्रभावित झालो आहे’, असे ‘फॉक्सकॉन’चे अध्यक्ष टेरी गाऊ यांनी सांगितले.
‘आमच्यावर विश्वास ठेवल्याने डब्ल्यू.डब्ल्यू.आय.तर्फे मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. तसेच या लॅबमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला टेक्नोलॉजीची मदत मिळेल. फॉक्सकॉनच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना व परिणामी,
सिनेसृष्टीला फायदा होईल,’ असे व्हिसलिंग वूड्सच्या अध्यक्षा मेघना घई-पुरी यांनी म्हटले आहे.
(प्रतिनिधी)