इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल मुंबईत

By Admin | Updated: May 21, 2014 05:01 IST2014-05-21T05:01:49+5:302014-05-21T05:01:49+5:30

मॉरिशसला होणार्‍या सोहळ्यापूर्वी मुंबईमध्ये १२ दर्जेदार चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य आहे

International Marathi Film Festival in Mumbai | इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल मुंबईत

इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हल मुंबईत

मुंबई : येत्या २० ते २४ जून या कालावधीत मॉरिशसमध्ये रंगणार्‍या इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हलची मुहूर्तमेढ मुंबईत रोवण्यात येत असून, मॉरिशसला होणार्‍या सोहळ्यापूर्वी मुंबईमध्ये १२ दर्जेदार चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य आहे. रवींद्र नाट्य मंदिरात २५ ते २७ मे या कालावधीत हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात प्रत्येक दिवशी ४ सिनेमांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. या महोत्सवात टाईमपास, दुनियादारी, रेगे, आजचा दिवस माझा, सत ना गत , फॅण्ड्री , यलो, सामर्थ्य , ७२ मैल एक प्रवास, झपाटलेला २, भाकरखाडी ७ किमी , प्रेम म्हणजे प्रेम असतं या निवडक चित्रपटांचा समावेश आहे. रसिकांनी याला चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: International Marathi Film Festival in Mumbai