Join us

आंतरराष्ट्रीय विमान प्रवास गेल्या वर्षभरात दोन ते तीन पटीने महागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 00:27 IST

सर्वाधिक प्रवासी वाहतूक असलेले दिल्ली ते पॅरिस आणि मुंबई ते लंडन हे दोन आंतरराष्ट्रीय मार्ग आहेत.

मुंबई : गेल्या एक वर्षात आंतरराष्ट्रीय विमान प्रवास दोन ते तीनपट महाग झाला आहे. गेल्या एप्रिलमध्ये जेट एअरवेज बंद झाल्यानंतर तिकीट दर झपाट्याने वाढले आहेत. सर्वाधिक प्रवासी वाहतूक असलेले दिल्ली ते पॅरिस आणि मुंबई ते लंडन हे दोन आंतरराष्ट्रीय मार्ग आहेत. डिसेंबर २०१८ मध्येदिल्ली - पॅरिसचे विमान तिकीट ४० हजार २० रुपये होते. ते एक वर्षात वाढून जवळपास तीनपट म्हणजे १ लाख १४ हजार ६४२ झाले आहे, मुंबई - लंडनचे विमान तिकीट ५३ हजार रुपयांवरून आता १ लाख २३ हजार ०२१ रुपये इतके झाले आहे. काही प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांच्या विमान तिकिटात झालेली वाढ तक्त्यात दाखवली आहे.आंतरराष्ट्रीय तिकीट दरमार्ग डिसें.२०१८ डिसें.२०१९दिल्ली-पॅरिस ४०,०२० १,१४,६४२मुंबई - लंडन ५३,०४१ १,२३,०२१मुंबई - अ‍ॅमस्टरडॅम ३५,७४५ ७२,५३९दिल्ली - न्यूयॉर्क ५८,०३४ १,५८,४०६दिल्ली - लंडन ५१,२६० ७४,७४२मुंबई - सॅनफ्रान्सिस्को ७२,५१४ १,१२,७६८

टॅग्स :मुंबई