Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंटर्न डॉक्टरांचा संप मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 04:57 IST

विद्यावेतन वाढीसाठी राज्यातील इंटर्न डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई : विद्यावेतन वाढीसाठी राज्यातील इंटर्न डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बुधवारी दुपारी असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्र संघटनेने हा संप मागे घेतल्याची घोषणा केली. याविषयी, असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. हृषिकेश मानकर यांनी सांगितले की, संघटनेच्या शिष्टमंडळाशी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी हा विषय कॅबिनेटमध्ये मांडून, त्यावर एक महिन्यात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे.