Join us  

‘रायन’च्या विश्वस्तांना अंतरिम दिलासा, आज सुनावणी, ठाकूर यांचा जामिनाला विरोध  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 4:44 AM

रायन इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्तांना अटकेपासून आणखी एक दिवस संरक्षण मिळाले आहे. आवश्यक ती कागदपत्रे नसल्याने पिंटो कुुटुंबीयांनी केलेल्या ट्रान्झिट जामिनावरील सुनावणी उच्च न्यायालयाने एक दिवस पुढे ढकलली. दरम्यान, प्रद्युम्नच्या वडिलांनी पिंटो कुुटुंबीयांच्या ट्रान्झिट जामीन अर्जामध्ये मध्यस्थी करत जामिनाला विरोध केला आहे.

मुंबई : रायन इंटरनॅशनल स्कूलच्या विश्वस्तांना अटकेपासून आणखी एक दिवस संरक्षण मिळाले आहे. आवश्यक ती कागदपत्रे नसल्याने पिंटो कुुटुंबीयांनी केलेल्या ट्रान्झिट जामिनावरील सुनावणी उच्च न्यायालयाने एक दिवस पुढे ढकलली. दरम्यान, प्रद्युम्नच्या वडिलांनी पिंटो कुुटुंबीयांच्या ट्रान्झिट जामीन अर्जामध्ये मध्यस्थी करत जामिनाला विरोध केला आहे.प्रद्युम्न ठाकूरचे वडील बरून ठाकूर यांनी पिंटो कुटुंबीयांनी दाखल केलेल्या ट्रान्झिट जामिनामध्ये मध्यस्थी अर्ज केला. मात्र अर्जाची प्रत पिंटो कुटुंबीयांच्या वकिलांना न दिल्याने न्या. अजय गडकरी यांनी याचिकांवरील सुनावणी तहकूब केली.‘तुम्ही (बरून ठाकूर) अर्जदारांना (पिंटो कुटुंबीय) अर्जाची प्रत दिली नाही. ती न देताच त्यांनी तुमच्या अर्जावर उत्तर देण्याची अपेक्षा कशी करता? आधी त्यांना अर्जाची प्रत द्या,’ असे म्हणत न्या. गडकरी यांनी या याचिकांवरील सुनावणी गुरुवारी ठेवत पिंटो कुटुंबीयांना अटकेपासून दिलेल्या संरक्षणात एक दिवसाची वाढ केली.रायन इंटरनॅशनल स्कूल समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रायन पिंटो, संस्थापक व अध्यक्ष आॅगस्टाईन पिंटो आणि व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हरयाणा न्यायालयात पोहचेपर्यंत पोलीस अटक करण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे त्या न्यायालयात पोहचेपर्यंत अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळवण्यासाठी पिंटो कुुटुंबीयांनी ट्रान्झिट जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.ठाकूर यांच्या मागण्या?ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे. शाळेच्या आवारात अत्यंत निर्घृणपणे माझ्या मुलाची हत्या करण्यात आली. हा दुर्मीळ गुन्हा असून, विश्वस्तांना सोडून जमणार नाही. अत्यंत क्रूरपणे माझ्या मुलाला मारण्यात आले. विश्वस्तांनी याची जबाबदारी झटकली आहे. शाळा व्यवस्थापनाने असंवेदनशीलता दाखवली आहे.वरिष्ठ अधिकारी याबाबत काहीही सबब देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा,’ असे ठाकूर यांनी म्हटले आहे.प्रद्युम्नच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता. प्रद्युम्नची हत्या करून त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर कंडक्टरने स्वत:च्या गुन्ह्याची कबुली दिली. मात्र हे सर्व संशयास्पद आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाºयांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याशिवाय काहीच उघड होणार नाही,’ असेही ठाकूर यांनी म्हटले आहे. या सर्व याचिकांवरील सुनावणी गुरुवारी ठेवण्यात आली.

टॅग्स :रेयान इंटरनॅशनल स्कूलशाळामुंबई हायकोर्ट