फडके नाट्यगृहाला विम्याचे कवच
By Admin | Updated: June 19, 2015 00:52 IST2015-06-19T00:52:33+5:302015-06-19T00:52:33+5:30
पनवेलमध्ये नगरपरिषदेमार्फत भूखंड क्र मांक २८७ वर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची उभारणी केली. १ जून २०१४ रोजी

फडके नाट्यगृहाला विम्याचे कवच
पनवेल : पनवेलमध्ये नगरपरिषदेमार्फत भूखंड क्र मांक २८७ वर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची उभारणी केली. १ जून २०१४ रोजी या नाट्यगृहाचे लोकार्र्पण करण्यात आले. आजपर्यंत या नाट्यगृहात अनेक नाटकांचे प्रयोग झाले आहेत. प्रेक्षकांचाही याठिकाणच्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. नगरपरिषदेने नाट्यगृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलले असून नाट्यगृहाचा विमा काढण्याचा निर्णय घतला आहे. त्यामुळे लवकरच या नाट्यगृहाला सुरक्षेचे कवच मिळणार आहे.
नाट्यगृहाच्या सुरक्षेचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. यावर चर्चा झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया करून पनवेल नाट्यगृहाचा विमा काढण्यात येणार आहे. हे नाट्यगृह अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आहे. तसेच आजवर मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांनी याठिकाणी हजेरी लावली आहे. विम्यामुळे संपूर्ण नाट्यगृह सुरक्षित होणार आहे. त्याअंतर्गत साऊंड सिस्टीम , प्रकाश यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा, लिफ्ट तसेच प्रयोग सादर करणाऱ्या कलाकारांचा या विम्यामध्ये समावेश असणार आहे. या विम्याची किं मत २२ कोटींच्या घरात असणार आहे.
नाट्यगृहाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या काळात सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. एखादी दुर्घटना घडल्यास त्याचा ताण नगरपरिषदेच्या तिजोरीवर पडेल, म्हणून आम्ही विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.
- अनिल भगत,
आरोग्य सभापती, पनवेल