Join us  

निवृत्त पोलिसांना भेटवस्तू त्वरित नेण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 2:09 AM

कोविडमुळे सार्वजनिक समारंभ, कार्यक्रमांवर बंधन आले आहे. त्यामुळे मार्चपासून निवृत्त होणारे अधिकारी, अंमलदार यांचा आयुक्त, सहआयुक्तांच्या हस्ते होणारे निरोप समारंभ करण्याचे कार्यक्रम बंद आहेत.

मुंबई : निवृत्तीनंतर खात्याकडून भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तू कार्यालयातून त्वरित घेऊन जाव्यात, अशा सूचना वरळी पोलीस मुख्यालयातील अंमलदारांकडून दिल्या जात आहेत. या कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक निरोप देणे दूरच, तर अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे निवृत्त झालेल्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कोविडमुळे सार्वजनिक समारंभ, कार्यक्रमांवर बंधन आले आहे. त्यामुळे मार्चपासून निवृत्त होणारे अधिकारी, अंमलदार यांचा आयुक्त, सहआयुक्तांच्या हस्ते होणारे निरोप समारंभ करण्याचे कार्यक्रम बंद आहेत. त्याऐवजी संबंधित उपायुक्त, सहायक आयुक्त किंवा वरिष्ठ निरीक्षकामार्फत स्थानिकस्तरावर मर्यादित स्वरूपात हा कार्यक्रम करावा, अशा सूचना दिल्या आहेत. पोलीस कल्याण निधीतून संबंधित कर्मचारी, त्याच्या कुटुंबीयांना छोटेखानी भेटवस्तू दिली जाते.

 

टॅग्स :पोलिसमुंबई