Join us  

रुग्णालयाच्या शवगृहातील काही बॉक्सेस कोविड -१९ मृतदेहांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 6:19 PM

कोविड १९ मृतदेह हाताळण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर

 

मुंबई : कोरोना मृतदेहांच्या बाबतीत गेल्या काही दिवसांत अनेक प्रकार घडून आले. काही ठिकाणी त्यामुळे कोरोना संसर्गात वाढ झाली तर ठिकाणी ते रुग्णालयातच पडून राहण्याचे प्रकार व्हायरल झाले. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कोरोना किंवा तत्सम आजारामुळे मृत पावल्याने, मृतदेहांची हाताळणी कशी करावी व त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत नियमावली जाहीर करून त्याच्या अमंलबजावणीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रुग्णालयांना कोविद - १९ च्या मृतदेहांची शवगृहात काही बॉक्सेस राखीव ठेवणे आवश्यक असून त्यावर तसे नमूद करणे आवश्यक असल्याचे नियमावलीत म्हटले आहे. तसेच अंत्यविधीच्या वेळी ही धार्मिक मंत्रपठण , विधी नातेवाईकांना दुरून करण्यास परवानगी असणार आहे.कूपर आणि सायन रुग्णालयांत कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांची हेळसांड झाल्याच्या प्रकरणानंतर महापालिकेकडून अशी नियमावली जाहीर करण्यात आली होती. आता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये साथरोग प्रतिबंध कायद्यातील तरतुदींनुसार मृतदेहांची हाताळणी आणि अंत्यसंस्कारांबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. सगळ्यात आधी मृतदेह हाताळणारे शवगृहातील कर्मचारी, शववाहिनीतील चालक व मदतनीस , आरोग्य सेवक या साऱ्यांना जंतूसंसर्ग टाळण्यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. या सगळ्यांनी संरक्षण साधने, मास्क, हातमोजे घालणे आवश्यक आहे. उपचारा दरम्यानची मृदेहाच्या शरीरावरील सर्व प्रकारची छिद्रे निर्जंतुक करून व्यवस्थात पट्ट्या लावून लगेचच मृतदेह प्लास्टिक शीटमध्ये किंवा रुग्णालयाने पुरविलेल्या बॅगमध्ये ठेवायला हवा. मृत व्यक्तीसाठी वापरलेली वैद्यकीय उपकरणे ही निर्जंतुक करणे गरजेचे आहे. मृतदेहाचे कपडे , वस्तू व संबंधित संबंधित सर्व कचरा हा जैविक कचरा व्यवस्थापन नियमांप्रमाणे विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.अंत्यसंस्काराच्या आधी किंवा त्यावेळी मृताच्या नातेवाईकांनी मृत व्यक्तीचा चेहरा पाहण्याची ईच्छा व्यक्त केल्यास तशी काळजी घेऊन दुरूनच त्याची परवानगी देण्यात यावी व मृतदेहावर कोणतेही चिन्हांकन करण्यात येऊ नये असे सांगण्यात आले आहे. अंत्यविधीसाठी नातेवाईकांनी गर्दी न करता त्यावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही तसेच  रुग्णालयानजीकच्या स्मशानभूमीत अत्यसंस्कार करावे अंत्यविधीच्या वेळी धार्मिक मंत्राचे ,पठण  दुरून पाणी शिंपडणे किंवा धार्मिक विधी दुरून करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. मात्र  जी व्यक्ती मृतासोबत शेवटचे १४  त्या व्यक्तीने वैद्यकीय  सल्ला, मदत , उपचार घेणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई