Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्डवर तांदळाऐवजी गव्हासोबत मक्याचा शिधा; नव्या बदलांमुळे मार्चपासून ताटातून आता भात गायब होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:35 IST

रेशन कार्डवर तांदळाऐवजी मका देण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी मका खरेदी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई :  सरकारतर्फे अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशन कार्डधारकांना नियमितपणे गहू व तांदूळ वितरित केले जातात. मात्र, मार्चपासून या वितरण पद्धतीत महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना रेशन कार्डवर  तांदळाऐवजी लाभार्थ्यांना गव्हासोबत मका दिला जाणार आहे. या निर्णयामुळे लाखो रेशन कार्डधारकांच्या शिध्यात बदल होणार आहे.

रेशन कार्डवर तांदळाऐवजी मका देण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी मका खरेदी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

खरेदी केलेला  संपूर्ण मका रेशन दुकानांमार्फत लाभार्थ्यांना वितरित केला जाणार असल्याने पुढील तीन महिने गव्हासोबत मका मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना तांदळाऐवजी मका मिळण्याची शक्यता आहे.

शहरी भागात संभ्रम अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा १० किलो मका आणि ११ किलो गहू दिला जाणार आहे, तर प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रत्येकी २ किलो गहू आणि १ किलो मका मिळणार आहे.  यामुळे शहरी भागातील नागरिकांमध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे.

रेशनवर तांदूळ दिला पाहिजे. मका आम्ही जेवणात आतापर्यंत कधी वापरला नाही, खाल्ला नाही, मुलांना तांदूळ खाण्याची सवय आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय बदलून पूर्वीप्रमाणे तांदूळ देण्याची गरज आहे. सरकारने निर्णय घेण्यापूर्वी सर्व समाजघटकांचा विचार करणे गरजेचे आहे.

राजेश धनू, माहिम

मुंबईत कोणते बदल होणार? अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम

मुंबईतील अधिकारी मात्र याबाबत काहीसे संभ्रमात असून, मुंबईतदेखील तांदळाऐवजी मका दिला जाईल का, याबाबत त्यांच्यामध्ये अनिश्चितता आहे. त्यामुळे यावर अधिकृतपणे बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे. नागरिकांमधूनदेखील मक्याऐवजी पूर्वीप्रमाणे शिधा म्हणून तांदूळ दिला जावा अशी मागणी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Rations: Corn replaces Rice; Food Security Concerns Rise

Web Summary : Maharashtra to replace rice with corn in ration shops, raising concerns among beneficiaries accustomed to rice. The new scheme will distribute corn alongside wheat. Urban residents express confusion, preferring rice. Officials uncertain about Mumbai's implementation.