पेपर तपासणीवर बहिष्काराचा इशारा
By Admin | Updated: February 23, 2017 04:42 IST2017-02-23T04:42:21+5:302017-02-23T04:42:21+5:30
दीर्घकाळ प्रलंबित आश्वासित व मान्य मागण्यांवर येत्या १० दिवसांत अंमलबजावणी न झाल्यास नाइलाजाने

पेपर तपासणीवर बहिष्काराचा इशारा
मुंबई : दीर्घकाळ प्रलंबित आश्वासित व मान्य मागण्यांवर येत्या १० दिवसांत अंमलबजावणी न झाल्यास नाइलाजाने ३ मार्च २०१७ पासून १२ वी बोर्डाच्या पेपरची तपासणी न करता ‘असहकार’ आंदोलन करण्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख म्हणाले की, याआधी संघटनेने २९ नोव्हेंबर आणि २२ डिसेंबर २०१६ रोजी आझाद मैदानावर इशारा आंदोलने केली. त्यानंतर ‘जेल भरो’ आंदोलन केले. मात्र प्रत्येक वेळी शिक्षणमंत्र्यांनी अंमलबजावणीचे आश्वासन दिले, परंतु ही आश्वासने सातत्याने हवेतच विरत आहेत. अधिकारी शिक्षणमंत्र्यांचे ऐकत नसल्यास अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे व शिक्षकांवरील अन्याय त्वरित दूर करावा, असे देशमुख यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)