Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अंतिम यादीपूर्वी केंद्रांची पाहणी करा'; आयुक्तांचे प्रशासनाला कडक निर्देश, गैरप्रकार करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:26 IST

निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी यांची संयुक्त बैठक गुरुवारी महापालिका मुख्यालयात झाली.

मुंबई : अंतिम यादी तयार करण्यापूर्वी मतदान केंद्रांची पाहणी करावी. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण द्यावे, असे आदेश पालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस, उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी यांची संयुक्त बैठक गुरुवारी महापालिका मुख्यालयात झाली. १० हजारांहून अधिक मतदान केंद्रे मुंबईत असणार आहेत.

विविध सोयी-सुविधांचा आढावा घेण्याची सूचना

पालिका हद्दीत १० हजार १११ मतदान केंद्रे असून, या केंद्रांवर वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, रॅम्प आदींची सुविधा करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी, पडताळणी करावी.

त्यानंतर अंतिम मतदान केंद्र यादी तयार करावी. मतदारांना त्यांची नावे शोधण्यासाठी मतदान केंद्रानजीक 'मतदार सहाय्य केंद्र' उभारावे, असे निर्देश गगराणी यांनी दिले.

'प्रशिक्षण बंधनकारक'

१. निवडणूक प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेणे बंधनकारक असून, सूचनांचे काटेकोर पालन झाले पाहिजे, अशी सूचनाही गगराणी यांनी केली.२. आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी २ पोलिस, उत्पादन शुल्क तसेच इतर संबंधित विभागांच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात.३. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी 3 केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवावे. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Inspect Polling Booths Before Final List: Strict Instructions Issued

Web Summary : Commissioner instructs officials to inspect polling booths before the final list. Training is mandatory for election staff. Strict action will be taken against misconduct and violations of the code of conduct. Ten thousand plus polling booths in Mumbai.
टॅग्स :महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६