ट्रायलॉजी क्लबच्या घटनेची चौकशी सुरू

By Admin | Updated: July 28, 2015 03:01 IST2015-07-28T03:01:15+5:302015-07-28T03:01:15+5:30

भारतीय असल्याने पबमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने सांताक्रूझ पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. याबाबत फिर्यादीसह हॉटेल सी प्रिन्सेसच्या ट्रायलॉजी

Inquiry of Triviali's case investigation | ट्रायलॉजी क्लबच्या घटनेची चौकशी सुरू

ट्रायलॉजी क्लबच्या घटनेची चौकशी सुरू

मुंबई : भारतीय असल्याने पबमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने सांताक्रूझ पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. याबाबत फिर्यादीसह हॉटेल सी प्रिन्सेसच्या ट्रायलॉजी क्लबच्या चालकाकडून जबाब घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पबच्या व्यवस्थापनाने आरोप फेटाळले आहेत.
शनिवारी मध्यरात्री जेनिफर चौहान, तिचा मित्र आणखी एका तरुण जोडपे ट्रायलॉजी क्लबमध्ये जात होते. मात्र त्यांना तेथील सुरक्षारक्षकांनी अडविल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, घडलेल्या प्रकाराची माहिती घेण्यात येत आह़े पबच्या व्यवस्थापनाने या घटनेचा इन्कार केलेला आहे. संबंधित मंडळी रात्री उशिरा आली होती. त्याचप्रमाणे त्यांचे नाव यादीत नसल्याने त्यांना प्रवेश देण्यात आला नसल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Inquiry of Triviali's case investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.