राडाप्रकरणी चौकशी सुरू
By Admin | Updated: February 16, 2017 05:15 IST2017-02-16T05:15:43+5:302017-02-16T05:15:43+5:30
भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू आणि विद्यमान नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी, शिवसेना उपशाखाप्रमुख सुरेश महाडिक

राडाप्रकरणी चौकशी सुरू
मुंबई : भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू आणि विद्यमान नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी, शिवसेना उपशाखाप्रमुख सुरेश महाडिक (६२) यांना मारहाण करण्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी प्रकाश दरेकर आणि त्यांच्या अन्य दोन साथीदारांवर दहिसर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे, तर दरेकर यांनीही महाडिक यांच्याविरोधात धमकावल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अद्याप कुणाला अटक झाली नसून तपास सुरू असल्याचे माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष सावंत यांनी दिली. (प्रतिनिधी)