पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा
By Admin | Updated: December 31, 2014 01:55 IST2014-12-31T01:55:16+5:302014-12-31T01:55:16+5:30
मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला असून, या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करण्यासाठी राज्यपालांनी न्यायालयानी चौकशीचे आदेश द्यावेत,

पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा
मुंबई : मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला असून, या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करण्यासाठी राज्यपालांनी न्यायालयानी चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी मंगळवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली.
मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार रोखला गेला तर मुंबईतील घरांच्या किंमती प्रति चौरसफुटामागे ५०० रुपयांनी कमी होतील, असे विधान खुद्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले आहे. तसेच महापालिकेतील भ्रष्टाचाराविषयी एका खासदारानेच ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यावरुन महापालिकेतील भ्रष्टाचाराची कल्पना येते. त्यामुळे हा भ्रष्टाचार खणून संबधितावर कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु राज्यात
आणि मुंबई महापालिकेत शिवसेना व युतीची सत्ता आहे. त्यामुळे राज्यपालांनी स्वत:च्या अधिकारात न्यायालयीन चौकशीचे आदेश द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)