प्रकल्पाच्या कामासाठी मदत अजस्र यंत्राची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:18 IST2020-12-04T04:18:22+5:302020-12-04T04:18:22+5:30
मुंबई : लॉकडाऊन शिथिल होत असतानाच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांनी वेग ...

प्रकल्पाच्या कामासाठी मदत अजस्र यंत्राची
मुंबई : लॉकडाऊन शिथिल होत असतानाच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुंबई महानगर प्रदेशात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांनी वेग पकडला आहे. विशेषत: यात पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांसह वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत ठिकठिकाणी गर्डर लाँच केले जातात. हे काम जिकिरीचे तसेच मेहनतीचे आणि संयमाचे आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आला असून गर्डर लॉँच करण्यासाठी पहिल्यांदाच भारतात वापरण्यात येत असलेले हे अजस्र यंत्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.