Join us

फडणवीसांच्या चाणक्यगिरीमुळे भाजपच्या जुन्या नेत्यांवर अन्याय; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 18:42 IST

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

अगोदर पंकजा मुंडे यांना कधी मंत्री करणार ते बघा, आम्ही आमच्या शिवसेनेत काय आहे ते पाहतो. देवेंद्र फडणवीस तुमच्या चाणक्यनीतीमुळे मुळ भाजपच्या नेत्यांवर अन्याय होत आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. भाजपमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून  गेलेल्या नेत्यांना मंत्रिपद मिळत आहे, पण मुळ भाजपच्या नेत्यांना मंत्रिपदापासून डावलले जात आहे. त्यामुळे अगोदर फडणवीसांनी ती कोडी सोडवली पाहिजेत, आयात केलेल्या नेत्यांनाच मंत्रिपद दिले जात आहे. त्यामुळे मुळ भाजपचे नेते अस्वस्त झाले आहेत, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.  

Bacchu Kadu vs Ravi Rana Latest News: '... तर घरात घुसून मारण्याची हिंमत'; रवी राणा थांबेचनात; बच्चू कडूंना थेट इशारा

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचा अभ्यासच नाही. तानाजी सावंत यांचा वैद्यकीय विभागाचा अभ्यास नाही, त्यांना त्या खात्याचे मंत्री केले आहे. ज्यांना ज्या खात्याचे कळत नाही, त्यांना त्या खात्याचे मंत्री केले. त्यामुळे आता राज्यात वेगळ्या पद्धतीचे राजकारण सुरु आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी हाफकीन कोण आहेत हेच अजून माहित नाही, असा टोलाही अंधारे यांनी लगावला. 

टॅग्स :सुषमा अंधारेदेवेंद्र फडणवीसशिवसेना