जखमी रुग्ण सात तास ताटकळला
By Admin | Updated: June 6, 2015 01:49 IST2015-06-06T01:49:26+5:302015-06-06T01:49:26+5:30
रेल्वे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तब्बल सात तास ताटकळत ठेवल्याचा प्रताप सेंट जॉर्ज रुग्णालयाने केला.

जखमी रुग्ण सात तास ताटकळला
मुंबई : रेल्वे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तब्बल सात तास ताटकळत ठेवल्याचा प्रताप सेंट जॉर्ज रुग्णालयाने केला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांच्या तक्रारीवरुन रुग्णालयातील डॉक्टर आणि वॉर्ड बॉयविरोधात एमआरएमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
सुरेश सरतापे(४५) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी पुणे येथून मुंबईला येताना त्याचा अपघात झाला. अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु होता. अशा अवस्थेत दुपारी १२च्या सुमारास सीएसटी रेल्वे पोलीस ठाण्याचे एपीआय एकनाथ उगळे यांनी तात्काळ सरतापेला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालय प्रशासनाने सरतापेला उपचार देण्याऐवजी बाहेरच ताटकळत ठेवले. त्याच्या काही वेळाने एक्सरे आणि रुग्णालयाच्या प्रक्रिया पुर्णर् करण्यासाठी संबधित डॉक्टर आणि वॉर्डबायने त्यांना इथून तिथे पळवले. तब्बल सात उलटूनही सरतापेवर उपचार सुरू झाले नव्हते. रुग्णालयाच्या निष्काळजीपणाची माहिती मिळतच उगळे यांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यातसंबधित डॉक्टर आणि वॉर्ड बॉय विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन एमआरएमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.
सुरेश सरतापे यांना झालेल्या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. सरतापे यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने उपचार देण्याऐवजी बाहेरच ताटकळत ठेवले.