Join us  

वेबसाइटवर महिलांबाबत अश्लील पोस्ट टाकत बदनामी करणारा बांगुरनगर येथे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:51 AM

क्लिअरिंग एजंट म्हणून काम करणारा पारेख हा मालाडच्या एव्हरशाईनमध्ये कुटुंबासह राहतो.

मुंबई : सोसायटीच्या कमिटीत सचिव पद गमावल्याच्या रागातून महिला पदाधिकाऱ्याचे फोटो अश्लील साईटवर टाकण्यात आल्याचा प्रकार बांगुरनगरमध्ये घडला. या प्रकरणी शिताफीने तपास करत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ११ ने शुक्रवारी एकाला अटक केली. अल्पेश वल्लभदास पारेख (४७) असे अटक आरोपीचे नाव आहे.क्लिअरिंग एजंट म्हणून काम करणारा पारेख हा मालाडच्या एव्हरशाईनमध्ये कुटुंबासह राहतो. नामांकित बँकेत काम करणाºया तसेच राहत्या सोसायटीत पदाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या उमा शाह (नावात बदल) यांनी १६ मे, २०१९ रोजी बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मोबाइलवर गेल्या काही दिवसांपासून अनेक अनोळखी व्यक्ती फोन करून शारीरिक सुखाची मागणी करीत होत्या. त्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्यांचा मोबाइल क्रमांक कुठून मिळाला याबाबत शाह यांनी चौकशी केली तेव्हा फोन करणाऱ्यांपैकी एकाने त्यांना छङ्मूंल्ल३ङ्म.ल्ली३ नामक एका साईटची लिंक पाठवत त्यावरून मोबाइल नंबर मिळाल्याचे सांगितले.गोंधळलेल्या शाह यांनी ती साईट पाहिल्यावर त्यांच्या सोसायटीमधील आणखी एक महिला तसेच पुरुष पदाधिकाºयाचे फोटो, त्यांचा मोबाइल क्रमांक त्यावर पोस्ट करत त्याखाली अश्लील मजकूर लिहिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या प्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.बांगुरनगर पोलिसांसह गुन्हे प्रकटीकरण शाखेची कक्ष ११ देखील या प्रकरणी समांतर तपास करीत होती.प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेत कक्ष ११ चे प्रमुख चिमाजी आढाव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रावराणे, रईस शेख, साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद झीने, नितीन उत्तेकर आणि सायबरचे वरदराज पारशी यांनी या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली आणि अखेर आरोपीला अटक केली.

टॅग्स :गुन्हेगारी