महिला व बालविकास विभागाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:05 IST2021-01-01T04:05:37+5:302021-01-01T04:05:37+5:30

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी ‘सावित्री उत्सव’ लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ...

Initiative of Women and Child Development Department | महिला व बालविकास विभागाचा उपक्रम

महिला व बालविकास विभागाचा उपक्रम

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी ‘सावित्री उत्सव’

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याच्या गौरवार्थ आणि भावी पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिवस महिला व बालविकास विभागाच्या वतीने ‘सावित्री उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ‘उत्सव सावित्रीचा, जागर स्त्री शक्तीचा’ ही मध्यवर्ती संकल्पना ठरवून त्यानुसार प्रत्येक अंगणवाडी, मिनी अंगणवाडी स्तरावर अर्थात गावांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले. यामध्ये स्त्री शिक्षणाच्या जनजागृतीसाठी ‘सावित्री दिंडी’चे आयोजन, अंगणवाडी, गावातील लहान मुलींना सावित्रीबाईंचा पेहराव करून स्त्री शिक्षणाचे आवाहन करण्यात येणार आहे. महिलांना कार्यक्रमात समाविष्ट करून त्यांच्याकडून सावित्रीबाईंच्या जीवनकथेचे वाचन करवून घेतले जाईल. त्याशिवाय कोरोना कालावधीत उत्कृष्ट सेवा बजावलेल्या कोविड योद्ध्या सेविका, मदतनिसांचा सत्कार करण्यात येणार आहे.

-------------------------

Web Title: Initiative of Women and Child Development Department