येशूच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज

By Admin | Updated: December 24, 2014 00:58 IST2014-12-24T00:58:10+5:302014-12-24T00:58:10+5:30

जिंगल बेल जिंगल बेल.... म्हणत लहान मुलांसह सर्वच जण नाताळ सणाच्या खरेदीमध्ये मग्न झाले आहे.

The inhabitants of the city are ready for Jesus' welcome | येशूच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज

येशूच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज

पूनम गुरव, नवी मुंबई
जिंगल बेल जिंगल बेल.... म्हणत लहान मुलांसह सर्वच जण नाताळ सणाच्या खरेदीमध्ये मग्न झाले आहे. त्यानिमित्ताने शहरातील सर्व बाजारपेठा नवनवीन चॉकलेट, केक, ख्रिसमस ट्री, सजावटीचे साहित्य आणि आकर्षक भेटवस्तूंनी सजले आहे. अनेक मॉल्स आणि दुकानामध्ये विविध वस्तूंवर आॅफर्स सुरू केल्या आहेत.
वेगवेगळी आकर्षक भेटवस्तू आणि खाऊ वाटणाऱ्या नाताळची आतापासूनच लहान मुले आतुरतेने वाट बघत आहेत. कालपर्यंत ख्रिसमस हा सण केवळ ख्रिस्ती समाजापुरताच मर्यादित होता, मात्र आजकाल थर्टीफर्स्टप्रमाणे ख्रिसमस सणही हिंदू आणि इतर कुटुंबेही तेवढ्यााच उत्साहात साजरा करत आहेत. नाताळनंतर पाच दिवसातच थर्टीफर्स्ट येत असल्याने नाताळ सणाबरोबरच नव्या वर्षाच्या स्वागतासाठी नवनव्या वस्तूंच्या खरेदीचे प्लानही सुरू झाले आहेत. वाशी सेक्टर ९, सानपाडा, कोपरखेरणे, ऐरोली, नेरूळ, सीवूड व मॉलमध्ये ग्राहकांनी नाताळसाठी खरेदी ला गर्दी केली होती.

Web Title: The inhabitants of the city are ready for Jesus' welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.