पायाभूत सुविधा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन -जेटली

By Admin | Updated: February 6, 2015 23:03 IST2015-02-06T23:03:42+5:302015-02-06T23:03:42+5:30

देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक वित्तीय मॉडेल लवकरच जाहीर केले जाईल, असे केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी आज सांगितले.

Infrastructure in Infrastructure Sectors - Jatley | पायाभूत सुविधा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन -जेटली

पायाभूत सुविधा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन -जेटली

मुंबई : देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक वित्तीय मॉडेल लवकरच जाहीर केले जाईल, असे केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी आज सांगितले.
राज्य शासन आणि मुंबई फर्स्ट या एनजीओच्या विद्यमाने येथे आयोजित, ‘मुंबई नेक्स्ट’ परिषदेत जेटली यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते.
जेटली म्हणाले, भारतातील पायाभूत सेवा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची अनेकांची तयारी असून अलिकडेच असे अनेक जण मला भेटले. मात्र, त्यांना स्थिर अशी करपद्धती व सातत्य असलेले वित्तीय मॉडेल हवे आहे. लवकरच ते केंद्राकडून दिले जाईल, असे जेटली यांनी रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या प्रश्नात
सांगितले. नवी मुंबई विमानतळ, कोस्टल रोडच्या परवानगींसाठी राज्य केंद्रावर अवलंबून आहे. मुंबईत दर्जेदार शिक्षण सुविधा उभारण्याचीही गरज असल्याचे अंबानी यावेळी म्हणाले. याचा अर्थ आपला देश केवळ परकीय गुंतवणुकीवर अवलंबून असेल असे नाही. त्यासाठी सरकारकडून होणारा खर्च आणि देशांतर्गत बचत वाढविण्यावर भर दिला जाईल. (विशेष प्रतिनिधी)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामाणिक आणि गतिमान निर्णय घेणारे असल्याची प्रशंसा करून त्यांनी, मी प्रामाणिक आहे पण निर्णय घेत नाही, असे तुम्ही म्हणू शकत नाही, असा चिमटा जेटली यांनी आधीच्या आघाडी सरकारला काढला.
‘मुंबई मेट्रोरिजनमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यास येत्या १० वर्षांत ९० अब्ज डॉलरची गरज असल्याचे मेकॅन्झी इंडियाचे संचालक शिरीष संखे म्हणाले. राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यावेळी उपस्थित होते.

Web Title: Infrastructure in Infrastructure Sectors - Jatley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.