गृहनिर्माण प्रकल्पाची माहिती एका क्लिकवर मिळणार; नवीन संकेतस्थळ अंतिम टप्प्यात

By सचिन लुंगसे | Published: January 30, 2024 10:59 AM2024-01-30T10:59:15+5:302024-01-30T10:59:21+5:30

फेब्रुवारी अखेर कार्यान्वित होण्याची शक्यता

Information about the housing project will be available in one click; New website in final stages | गृहनिर्माण प्रकल्पाची माहिती एका क्लिकवर मिळणार; नवीन संकेतस्थळ अंतिम टप्प्यात

गृहनिर्माण प्रकल्पाची माहिती एका क्लिकवर मिळणार; नवीन संकेतस्थळ अंतिम टप्प्यात

मुंबई - महारेराने 5 वर्षांपूर्वी मे 2017 ला स्थापनेच्यावेळी  तयार केलेल्या संकेतस्थळात काळसुसंगत अमुलाग्र बदल करायला सुरुवात केलेली आहे. नवीन संकेतस्थळ महारेराक्रिटी म्हणजे तक्रार आणि विनियामक एकात्मिक तंत्रज्ञान अंमलबजावणी  ( Complaint and Regulatory Integrated Technology Implementation- CRITI) अशा नावाने ओळखले जाईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत  हे संकेतस्थळ पूर्णतः सुरू होणे अपेक्षित आहे. त्यासाठी तांत्रिक बाब म्हणून सध्याचे संकेतस्थळ त्या काळात काही दिवसांसाठी स्थगित ठेवावे लागणार आहे. 

संकेतस्थळ वापरकर्ता स्नेही ( User friendly) राहणार आहे. ग्राहकांना उपयुक्त ठरतील असे अनेक  घटक यात राहणार आहेत. यात विशेषत्वाने ग्राहकांना तक्रारी नोंदवणे अधिक सोपे व्हावे यासाठी विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. शिवाय सध्याच्या प्रकल्पाची ग्राहकांना सहजपणे माहिती उपलब्ध व्हावी यासाठी संक्षिप्त रूपात प्रकल्पस्थिती (Project Health Summary) ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती संकेतस्थळावर असणार आहे.  ज्यामुळे घर खरेदीदारांना गुंतवणूक केलेली असल्यास किंवा करायची असल्यास त्या प्रकल्पाची सद्यस्थिती सहजपणे उपलब्ध होणार आहे.

यात विकासकांसाठीही अनेक घटक आहेत. यातील महत्त्वाचे म्हणजे विकासकांना सध्या प्रपत्र 1, 2 आणि 3  तिमाही आणि प्रपत्र 5 वर्षाला  सादर करावे लागते. अनेक पानांचा दस्तावेज असतो. हे संकेतस्थळ कार्यान्वित झाल्यानंतर   ही माहिती सहजपणे भरण्याची सोय करण्यात आलेली आहे. या नवीन संकेतस्थळामुळे एकूण स्थावर संपदा क्षेत्रात पारदर्शक ( Transparency), जबाबदेयता ( Accountability)  आणि कार्यक्षमता ( Efficiency) वाढीस लागायला मदत व्हावी, असा महारेराचा प्रयत्न राहणार आहे.

Web Title: Information about the housing project will be available in one click; New website in final stages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई