सिडकोच्या प्रकल्पांची माहिती संकेतस्थळावर
By Admin | Updated: May 22, 2014 03:20 IST2014-05-22T03:20:49+5:302014-05-22T03:20:49+5:30
सिडको प्रशासनाने शहरातील सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला

सिडकोच्या प्रकल्पांची माहिती संकेतस्थळावर
नवी मुंबई : सिडको प्रशासनाने शहरातील सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१८ प्रकल्पांच्या कामांची सद्य:स्थिती, ते कधी पूर्ण होणार याची माहिती दिली आहे. कामकाजातील पारदर्शकतेसाठी हा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरात सिडकोने अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू केले आहेत. सीवूड रेल्वे स्टेशन, वाशीतील एक्झिबिशन सेंटर, सीवूड - उरण रेल्वे मार्ग, मेट्रो व इतर अनेक प्रकल्प सुरू आहेत. शहरातील प्रकल्प कधी सुरू झाले. त्याची निविदा कधी काढण्यात आली. प्रकल्पाचा नियोजित खर्च किती आहे. प्रकल्पाशी संबंधित अधिकारी कोण आहे व त्यांचा संपर्क नंबरही देण्यात येणार आहे. जवळपास ३१८ प्रकल्पांची माहिती उपलब्ध असणार आहे. कामकाजामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोने नियोजन विभागाच्यावतीने देण्यात येणार्या बांधकामांबद्दलची माहितीही संकेतस्थळावर दिली आहे. यामध्ये पनवेल आणि उरण तालुक्यातील नवीन पनवेल, उलवे, कामोठे, द्रोणागिरी, कळंबोली, काळुंद्रे, गवाण, तळोजा पंचानंद आणि खारघरमधील ७ एप्रिलपासून देण्यात येणार्या बांधकाम परवाना व भोगवटा प्रमाणपत्राची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)