करपा रोगाची पिकांना लागण
By Admin | Updated: September 21, 2014 23:57 IST2014-09-21T23:57:29+5:302014-09-21T23:57:29+5:30
मुरुड तालुक्यात बहुतांशी पिकांना करपा या बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. अंबोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज कमाने यांच्या शेतातील पिकांना तसेच अन्य ग्रामीण भागात ही लागण

करपा रोगाची पिकांना लागण
आगरदांडा : मुरुड तालुक्यात बहुतांशी पिकांना करपा या बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. अंबोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज कमाने यांच्या शेतातील पिकांना तसेच अन्य ग्रामीण भागात ही लागण लागल्याने अनेक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
यावेळी मुरुड तालुक्यात २२०० मि. मी. एवढा पाऊस पडला आहे. पाऊस जास्त पडल्याने तसेच हवामान बदलामुळे आणि एकात्मिक रोग व्यवस्थापनाचा अवलंब न केल्यामुळे या करपा रोगांची लागण पिकांना झालेली आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास पीक वाया जाण्याची भीती असतानाच हा रोग आल्याने पुढील दिवसात पीक टिकेल, की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच या भागाचा दौरा करुन योग्य ती उपाययोजना करु असे सांगितले. (वार्ताहर)