बाळ विकण्याचा डाव फसला
By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:23+5:302015-12-05T09:09:23+5:30
अवघ्या दोन दिवसांच्या नवजात शिशूला आईच्या नकळत बापानेच विकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अंबरनाथच्या गायकवाडनगर परिसरात हा

बाळ विकण्याचा डाव फसला
अंबरनाथ : अवघ्या दोन दिवसांच्या नवजात शिशूला आईच्या नकळत बापानेच विकण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अंबरनाथच्या गायकवाडनगर परिसरात हा प्रकार घडला आहे. मूल घेऊन जात असताना लोकलमधील महिलांच्या निदर्शनास आल्यामुळे हा डाव फसला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
अरु णा जाधव यांचे दोन दिवसांचे बाळ दोन महिलांनी पळवून नेले होते. अरुणाचा पती व्यसनी आहे. मुलाला दत्तक दिल्यास पैसे मिळतील, असे आरोपी आरती पाटील आणि सुशीला वाळुंज यांनी बापाला सांगितले. त्यानेही हा सौदा मंजूर करून त्यांना बाळ पळविण्यासाठी मदत केली. मात्र, लोकलमधून मूल घेऊन जात असताना एका सामाजिक कार्यकर्त्याला संशय आल्याने त्यांनी ही माहिती डोंबिवली रेल्वे पोलिसांना दिली. चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला. (प्रतिनिधी)