Join us

धारावीच्या पुनर्विकासात उद्योगांना तळ आणि पहिल्या माळ्यावर स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 09:35 IST

प्रकल्पाला धारावीतून विरोध वाढतच असताना विरोधकांकडून सातत्याने मास्टर प्लान जाहीर करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : धारावीचा पुनर्विकास करताना येथील रहिवाशांचा त्यांच्या उद्योग, व्यवसायाशी असलेला संबंध कायम राहील, अशा दृष्टीने आता या प्रकल्पाचा मास्टर प्लान निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मोठ्या औद्योगिक यंत्रांसाठी सक्षम आणि पायाभूत संरचनेच्या दृष्टिकोनातून मजबूत अशा पोडियम इमारतींची योजना आखली जात आहे. त्यामुळे तळ-मजला व पहिल्या मजल्यावर उद्योग उभारले जातील आणि वरील मजल्यांवर रहिवासी राहू शकतील, असे नियोजन करण्यात आले असून हा मास्टर प्लॅन लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रकल्पाला धारावीतून विरोध वाढतच असताना विरोधकांकडून सातत्याने मास्टर प्लान जाहीर करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. त्यातच आता मास्टर प्लानचे काम पूर्ण होत आले आहे. या प्रकल्पातंर्गत घरे, व्यावसायिक, औद्योगिक गाळ्यांचे पुनर्वसन करता यावे म्हणून सर्वेक्षण सुरू असून, सर्वेक्षणाच्या आधारावर पात्र आणि अपात्रता निश्चित करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास मास्टर प्लानचे मुख्य उद्दिष्ट धारावीची संस्कृती संगत जीवनपद्धती जपणे हे आहे, असे सूत्रांनी सांगितले.

शासन ठरविणार सर्वेक्षण पूर्ण नसल्यामुळे कुंभारवाडा व रीसायकलिंग क्षेत्रातील उद्योग आणि राहण्याच्या जागांची भविष्यातील शक्यता केवळ उपलब्ध अंदाजाच्या आधारे ठरवण्यात आली आहे. हे क्षेत्र पुनर्विकास योजनेच्या कक्षेत येईल की नाही, हे शासन ठरविणार आहे.

७ वर्षांत काय? पुनर्वसन हा प्राधान्यक्रम आहे. पुनर्वसन आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा यास प्रथम प्राधान्य आहे. पुनर्वसनासाठी जे काही आवश्यक आहे, ते पुढील सात वर्षांत पूर्ण केले जाईल. 

मास्टर प्लानचा उद्देशपुनर्वसनासाठी घेतलेला निर्णय विज्ञान आणि तर्काच्या आधारावर असेल. जेणेकरून रहिवाशांचे जीवन सुरक्षित होईल. या योजनेत सुधारणा करण्यासाठी कोणतीही सूचना स्वागतार्ह आहे.

पुनर्विकासात काय ?मोकळ्या सार्वजनिक जागा.मेट्रो सेवा, रेल्वे, बस, फीडर सेवा आणि नॉन-मोटारायज्ड वाहतुकीसाठी मल्टी-मोडल ट्रांझिट हबची योजना.

टॅग्स :मुंबईझोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण