Join us

'इंदू मिलप्रकरणी काँग्रेसची भूमिका बघ्याचीच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 05:00 IST

केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही काँग्रेसने इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न तडीस नेला नाही.

मुंबई : केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही काँग्रेसने इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न तडीस नेला नाही. उलट मिलच्या जागी कमर्शियल सेंटर उभारून कोट्यवधी कमविण्याचा काँग्रेसचा डाव होता, असा आरोप माजी आमदार विजय कांबळे यांनी केला.मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलीकडेच इंदू मिलवरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेस जाहीरनाम्यातच इंदू मिल येथील स्मारकाचे आश्वासन दिल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले होते. मात्र आंबेडकरी मतांवर डोळा ठेवून काँग्रेस, राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात इंदू मिल स्मारकाचे पोकळ आश्वासन दिले. त्यासाठी सकारात्मक भूमिका कधीच घेतली नाही, असे कांबळे म्हणाले.