इंद्राणीला न्यूमोनियाची लागण; प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 05:49 IST2018-04-09T05:49:36+5:302018-04-09T05:49:36+5:30

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची प्रकृती आता स्थिर आहे. इंद्राणीला ताप आणि न्यूमोनिया असल्याचेही निदान झाले.

Indrani pneumonia infection; The condition is stable | इंद्राणीला न्यूमोनियाची लागण; प्रकृती स्थिर

इंद्राणीला न्यूमोनियाची लागण; प्रकृती स्थिर

मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची प्रकृती आता स्थिर आहे. इंद्राणीला ताप आणि न्यूमोनिया असल्याचेही निदान झाले. ती औषधोपचाराला उत्तम प्रतिसाद देत आहे, असे सर जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
सध्या इंद्राणी भायखळा तुरुंगात शिक्षा भोगत असून तिची प्रकृती शुक्रवारी अचानक ढासळली. तिला जे.जे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले होते. तिच्या वैद्यकीय तपासण्या केल्या असून एक महत्त्वाचा रिपोर्ट अजून आला नाही. त्यामुळे इंद्राणीला नेमके काय झाले हे आताच काही सांगणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Indrani pneumonia infection; The condition is stable