मुंबई : इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांनी २०१२मध्ये शीनाला शोधण्याची विनंती आपल्याला केली होती. मात्र काही दिवसांनी त्यांनी तिचा शोध लागल्याचे सांगून तपास थांबविण्याची विनंती केली होती, अशी साक्ष मुंबईचे पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांनी सोमवारी सत्र न्यायालयात दिली.बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणी तपासात देवेन भारती यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत भारती यांनी आपली साक्ष नोंदविली. मंगळवारी त्यांची उलटतपासणी होणार आहे. त्यांनी सांगितले की, मुखर्जी दाम्पत्याची ओळख २००२मध्ये झाली होती. त्या वेळी आपण उपायुक्त म्हणून एसबी-१मध्ये कार्यरत होतो. त्यानंतर गुन्हे शाखेत काम करीत असताना २०१२च्या सुमारास शीना व पीटर आपल्याकडे आले होते. त्यांनी आपला एक नातेवाईक हरवला असून तिचा शोध घेण्यास सांगून मोबाइल नंबर दिला होता. मात्र काही दिवसांनी त्यांनी फोन करून ती व्यक्ती सापडली असून तपासकार्य थांबविण्याची विनंती केली. शीनाच्या खुनाचा उलगडा झाला, त्या वेळी तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत होतो, त्यामुळे खार पोलीस ठाण्यात जाऊन दोनदा जबाब नोंदविला. त्या वेळी त्यांनी दिलेला मोबाइल क्रमांक व २०१२मध्ये दिलेला क्रमांक एकच असल्याचे लक्षात आले. त्याची माहिती आपण तपास करणाºया निरीक्षकाला दिल्याचे ते म्हणाले.
इंद्राणी - पीटर २०१२ मध्ये भेटले होते - देवेन भारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 03:00 IST