इंद्राणी मुखर्जीला केले जेजे रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:10 IST2018-04-07T01:10:13+5:302018-04-07T01:10:13+5:30

शीना बोरा हत्याकांडातील आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी रात्री जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Indrani Mukhrji admitted in JJ hospital | इंद्राणी मुखर्जीला केले जेजे रुग्णालयात दाखल

इंद्राणी मुखर्जीला केले जेजे रुग्णालयात दाखल

मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी रात्री जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीची प्रकृती शुक्रवारी रात्री अचानक बिघडली. त्यानंतर कारागृह प्रशासनाने तिला तातडीने जेजे रुग्णालयात दाखल केले. 
शीना बोरा हत्याकांडातील आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्या प्रकृतीत झालेल्या बिघाडाचे नेमके कारण आणि तिने कुठल्या गोळ्यांचे सेवन केले आहे का हे शोधण्यासाठी वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी गेल्या अडीच वर्षांपासून कारागृहात आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे.  

Web Title: Indrani Mukhrji admitted in JJ hospital