आज स्वदेशी बनावटीच्या मेट्रोचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST2021-02-05T04:27:46+5:302021-02-05T04:27:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बंगळुरू येथून मुंबईत २७ जानेवारीला दाखल झालेल्या मेट्रोचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ...

Indigenous Metro unveiled today | आज स्वदेशी बनावटीच्या मेट्रोचे अनावरण

आज स्वदेशी बनावटीच्या मेट्रोचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बंगळुरू येथून मुंबईत २७ जानेवारीला दाखल झालेल्या मेट्रोचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २९ जानेवारी दुपारी ३ वाजता चारकोप डेपोमध्ये हाेईल. ब्रँडिंग मॅन्युअल, ट्रॅव्हल कार्ड, ऑपरेशनल कंट्रोल सेंट्रल, चारकोप आगार आणि रिसिव्हिंग सबस्टेशनचेही यावेळी उद्घाटन करण्यात येईल.

कोरोना संसर्ग लक्षात घेऊन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव हेदेखील उपस्थित असतील. बंगळुरू येथून २२ जानेवारीला मेट्रो मुंबईच्या दिशेने निघाली होती. मेट्रो २ अ आणि ७ या मार्गावर ही चालकविरहित स्वदेशी बनावटीची मेट्रो धावेल.

दोन महिन्यांत मेट्रोच्या ट्रायल रन्स सुरू होतील. मेपासून ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. पहिल्या सहा ट्रेन येत्या सहा महिन्यांत दाखल होतील.

.........................

Web Title: Indigenous Metro unveiled today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.