भारताचा सलग दुसरा पराभव

By Admin | Updated: June 2, 2014 23:45 IST2014-06-02T23:45:37+5:302014-06-02T23:45:37+5:30

अखेरच्या क्षणी गोल स्वीकारण्याची परंपरा भारतीय संघाने विश्वकप हॉकी स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीतही कायम राखली.

India's second consecutive defeat | भारताचा सलग दुसरा पराभव

भारताचा सलग दुसरा पराभव

>हेग : अखेरच्या क्षणी गोल स्वीकारण्याची परंपरा भारतीय संघाने विश्वकप हॉकी स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीतही कायम राखली. इंग्लंडने अखेरच्या क्षणी गोल नोंदवित सोमवारी ‘अ’ गटात खेळल्या गेलेल्या लढतीत भारताचा 2-1 ने पराभव केला. 
इंग्लंडने 69 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर सायमन मॅन्टेलने गोल नोंदवित इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या लढतीत भारतीय संघाने तुल्यबळ खेळ केला, पण अखेर त्यांना पराभव टाळण्यात अपयश आले.
 भारताला मिळालेला एक पेनल्टी स्ट्रोक रद्द करण्यात आल्यामुळे इंग्लंडचा विजयाचा मार्ग मोकळा केला. अखेरच्या क्षणी गोल स्वीकारणा:या भारताला सलामी लढतीत बेल्जियमविरुद्ध 2-3 ने पराभव स्वीकारावा लागला होता.
अॅश्ले ज्ॉक्सनने पेनल्टी कॉर्नरवर मारलेला फटका गोलकिपर पी.आर. श्रीजेशने अडविला, पण रिबाऊंडवर मिळालेल्या संधीचा लाभ घेत मॅन्टेलने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित इंग्लंडला विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले. मार्क ग्लेघोर्नने 26 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नवर गोल नोंदवित इंग्लंडचे खाते उघडले. त्यानंतर 3क् व्या मिनिटाला धरमवीर सिंगने गोल नोंदवित भारताला बरोबरी साधून दिली. भारताने पहिला सामना बेल्जियमविरुद्ध 2-3 ने गमावला. हा सामना देखील अखेरची शिटी वाजण्याच्या काही क्षणांपूर्वी भारताच्या हातून निसटला. ऑस्ट्रेलिया आता गटात 6 गुणांसह आघाडीवर आहे. मलेशिया आणि स्पेनचा या संघाने पराभव केला. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ इंग्लंडचे चार गुण आहेत. स्पेनला पहिल्या सामन्यात इंग्लंडने 
1-1 ने बरोबरीत रोखले होते.(वृत्तसंस्था)

Web Title: India's second consecutive defeat