Join us

सूरज्योत्स्ना संवादात आज इंडियन आयडॉल फेम रोहित राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 07:25 IST

दिवंगत श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मरणार्थ लोकमत माध्यम समूहाने हे सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सुरू केले आहेत.

मुंबई : भारतीय अभिजात संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येणारा सूरज्योत्स्ना संवाद गुरूवारी इंडियन आयडॉल २०२० फेम रोहित राऊत याच्याशी संवाद साधण्याची आणि सदाबहार गाणी त्याच्याच आवाजात ऐकण्याची संधीही रसिकांना मिळेल.यूट्यूब आणि फेसबुक लाइव्हवर रात्री ९.३० वा. संवाद साधतील अभिनेत्री सानिका काशीकर.दिवंगत श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मरणार्थ लोकमत माध्यम समूहाने हे सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सुरू केले आहेत.या संवादातील इतर कलाकार व त्यांच्या तारखा : २२ मे : अंकिता जोशी २३ मे : मंगेश बोरगावकर २४ मे : रीवा राठोड...या कलाकारांना भेटण्यासाठी तुम्ही करायचं ते इतकंच : https://bit.ly/3cvRWB8  या लिंकवर नोंदणी करा.

टॅग्स :रोहित राऊतलोकमत