महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ

By Admin | Updated: January 10, 2015 01:55 IST2015-01-10T01:55:59+5:302015-01-10T01:55:59+5:30

देशभरातील रेल्वेच्या उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा महत्त्वपूर्ण असून त्यातही मुंबईचे योगदान अनन्यसाधारण आहे.

Independent Financial Corporation for Maharashtra | महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ

सुरेश प्रभू यांची ग्वाही : आगामी बजेटमध्ये करणार तरतूद
अनिकेत घमंडी ल्ल ठाणे
देशभरातील रेल्वेच्या उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा महत्त्वपूर्ण असून त्यातही मुंबईचे योगदान अनन्यसाधारण आहे. त्यामुळे आगामी बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या २९ व्या व्याख्यानमालेनिमित्त ते येथे आले होते. त्या वेळी उपनगरीय रेल्वे
प्रवासी एकता संस्थेसह अन्य संघटनांशी संवाद साधताना ते बोलत होते.
त्या वेळी आमदार संजय केळकर, रवींद्र चव्हाण, संजय वाघुले, संदीप लेले आदींसह ठाणे जिल्ह्णातील विविध प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दिवनीक बँक्वेट हॉलमध्ये ही चर्चा संपन्न झाली. ते पुढे म्हणाले की, उपनगरीय रेल्वे वाहतुकीला सातत्याने विविध तांत्रिक समस्या उद्भवत असून त्यासाठी आगामी काळात टेक्निकल टास्क फोर्सची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यातून समस्या कमी व्हाव्यात, हा प्रयत्न असेल. मुंबईतील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे-जे तोडगे असतील, त्या-त्या सर्वांचा उपयोग करण्यात येईल. त्यासाठी ठिकठिकाणच्या प्रवासी संघटनांनाही हाताशी धरण्यात येईल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेदेखील सकारात्मक विचारांचे असून त्यांनीही रेल्वेच्या विविध प्रकल्पांबाबत तातडीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मुळातच मी मुंबईकर आहे, मला येथील समस्यांची जाण आहे. अजूनही रेल्वेने प्रवास करणे जास्त पसंत करत असून माझ्यासह कुटुंबीयदेखील रेल्वेचाच पर्याय निवडतात. दिव्यातील घटना अप्रिय होती, ते कोणी का केले, याच्या खोलात फारसे न जाता तसे पुन्हा होऊ नये, यासाठी भर देणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

रेल्वेमंत्र्यांसमोर मनोहर शेलार, अ‍ॅड. आदेश भगत, मधू कोटीयन, नाझिमा सय्यद आदींसह अन्य प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही मनोगते मांडून प्रवाशांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचेही प्रभूंनी स्वागत केले. शेलार यांनी मांडलेल्या विभागीय स्तरावर साप्ताहिक सुट्यांवर विचार करणार असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Independent Financial Corporation for Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.