प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वाढती मागणी

By जयंत होवाळ | Published: March 22, 2024 09:36 PM2024-03-22T21:36:59+5:302024-03-22T21:37:20+5:30

Mumbai News: प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची मागणी वाढत असून कुलाब्यातील नेव्ही आणि आर्मी संरक्षण विभागासाठी आणखी साडेतीन दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाणार आहे.  या विभागाला सध्या दररोज  १७ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

Increasing demand for treated wastewater | प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वाढती मागणी

प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वाढती मागणी

- जयंत होवाळ  
मुंबई - प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची मागणी वाढत असून कुलाब्यातील नेव्ही आणि आर्मी संरक्षण विभागासाठी आणखी साडेतीन दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाणार आहे.  या विभागाला सध्या दररोज  १७ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.

२०२० सालापासून पालिकेचे  कुलाबा येथील मलजल प्रक्रिया सुविधा केंद्र  सुरु आहे. या केंद्रात कुलाबा विभागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून रोज सुमारे २५ दशलक्ष लिटर पाणी समुद्रात सोडले जाते. हे पाणी मारिन आऊट   फोलच्या माध्यमातून समुद्रात १. ५ किमी आत सोडले जाते. कुलाबा विभागाला आणखी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पालिकेच्या मलनिःसारण प्रकल्प विभागामार्फत एम.एस.डी .पी. अंतर्गत सूयझ प्रा.ली. या कंपनीने नव्याने उभारण्यात आलेल्या कुलाबा सांडपाणी प्रक्रिया सुविधा केंद्र येथे प्रक्रिया केलेले सांडपाणी घेण्यास तयारी दर्शवली आहे.

नेव्ही  आणि आर्मी संरक्षण विभागाच्या संस्थांनी कुलाबा उदंचन केंद्राच्या मुख्यद्वारापासून ते नेव्ही आणि आर्मी विभागाच्या भूमिगत टाकी पर्यंत स्वखर्चाने पाईप लाईन टाकली आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी एक रुपया प्रति एक हजार लिटर दराने दिले जाणार आहे. हा दर तीन वर्षासाठी निश्चित करण्यात आला आहे. या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी केला जातो.

Web Title: Increasing demand for treated wastewater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई