्नरुग्णालयांचा दर्जा वाढला, सुविधांची वानवा

By Admin | Updated: May 29, 2015 23:14 IST2015-05-29T23:14:47+5:302015-05-29T23:14:47+5:30

येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि सरकारी अनास्थेमुळे रोहा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा केवळ कागदोपत्री वाढला आहे.

Increased quality of the hospital, facilities and facilities | ्नरुग्णालयांचा दर्जा वाढला, सुविधांची वानवा

्नरुग्णालयांचा दर्जा वाढला, सुविधांची वानवा

रोहा : येथील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. परंतु लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि सरकारी अनास्थेमुळे रोहा उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा केवळ कागदोपत्री वाढला आहे. रुग्णालयात आवश्यक सोयी-सुविधा, डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार झाला आहे.
आपत्ती निवारणासंदर्भातील सभा येथे नुकतीच पार पडली. त्यावेळी रोहा उपजिल्हा रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. तालुक्यातील कोकवन, नागोठणे, आंबेवाडी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून संभे, धाटाव, तळवली, सुतारवाडी, कुडली, गारभट, मेढा, यशवंतखार, पळस, वणी, खांब, ऐनघर, भालगाव, घोसाळे, विरझोली, वाली, सारसोली, न्हावे, बिरवाडी, आरेबुदु्रक अशी वीस आरोग्य उपकेंद्रे आहेत. या केंद्रामधून राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे, रुग्णांवर प्राथमिक स्वरुपाचे उपचार, प्रसूती, लसीकरण, साथीचे रोग नियंत्रण यासाठी उपाययोजना केल्या जातात.
रोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ त्याचप्रमाणे वैद्यकीय अधीक्षक वर्ग १ चे एक पद, वैद्यकीय अधिकारी वर्ग २ ची एकूण सात पदे, विशेष तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका ४ पदे, असिस्टंट मेट्रन व सिस्टर इनचार्जची २ पदे, फार्मासिस्ट २ पदे, लिपिक वर्ग ३ ची दोन पदे, अधिपरिचारिका ही पदे रिक्त आहेत. या शिवाय करारपध्दतीवर नेमण्यात आलेले चालक, धोबी, सफाई कामगार यांचे वेतन मागील चार महिन्यांपासून थकीत आहे.
रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांची भरती रायगड सुरक्षा रक्षक मंडळातर्फे करण्यात आली असली तरी त्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने आर्थिक ओढाताण होते.
रुग्णालयातील औषधांच्या साठ्याबाबत माहिती घेतली असता सर्प, विंचू, श्वानदंशावरील औषधे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. याठिकाणी व्हेंटीलेटरची आवश्यकता आहे. परंतु ही सुविधा केवळ जिल्हा रुग्णालयातच उपलब्ध आहे.
रुग्णालयातील दोन इनर्व्हटर पैकी एक नादुरुस्त आहे. याशिवाय मेजर आॅपरेशन थिएटरमधील मोबाइल आणि सिलिंग शॅडोलेस लँप नादुरुस्त आहेत. अ‍ॅनेस्थेशिया मशिन, इसीजी मशिन, होरिझन्टल अ‍ॅटोक्लेव्ह, ३ एसी, नादुरुस्त आहेत.
नवीन इमारतीला वर्षभरातच गळती लागली आहे. शुध्द पाण्यासाठी वॉटर फिल्टर नाहीत. वर्षभरापूर्वी झालेल्या अपघातानंतरही उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभारात काहीही सुधारणा झाली नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)

च्कर्जत : हा आदिवासी बहुल तालुका आहे. याठिकाणी जिल्हा परिषदेकडून प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्य उपकेंद्र चालविली जातात. मात्र रुग्णालयातील डॉक्टर, आरोग्यसेविकांची अनेक पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे.
च्पावसाळा तोंडावर आल्याने उपकेंद्रातील आरोग्यसेविकांची पदे तत्काळ भरण्याची मागणी आदिवासी कार्यकर्ते वामन ठोंबरे आणि दिशा केंद्राचे सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांनी केली आहे.
च्तालुक्यात नेरळ,कडाव, मोहिली, कळंब, खांडस आणि आंबिवली येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्याशिवाय ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
च्आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी डॉक्टर आणि आरोग्य सेविकांनी राहणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून राहण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी आरोग्य कर्मचारी याठिकाणी राहताना दिसत नाहीत.
च्३८ आरोग्य उपकेंद्रापैकी ११ उपकेंद्रात आरोग्य सेविकांची पदे रिक्त आहेत. परिणामी ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य उपकेंद्रात सेवा मिळत नाही. अशावेळी त्यांना १५-२0 किलोमीटर अंतर पार करीत प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घ्यावी लागते.
च्याठिकाणचे डॉक्टर उच्च शिक्षणासाठी दीर्घ रजेवर आहेत. त्यामुळे नेरळ, कडाव आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. त्यात कोदिवले, पिंपळोली, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्यालय, चिंचवली, वैजनाथ आदीं गावांचा समावेश आहे.

Web Title: Increased quality of the hospital, facilities and facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.