वाढीव बेटाला धोका

By Admin | Updated: August 27, 2014 00:18 IST2014-08-27T00:18:41+5:302014-08-27T00:18:41+5:30

सफाळेजवळील वाढीव हे सुमारे २५०० लोकसंख्येचे पूर्ण खाडीच्या मध्यभागी वसलेले बेट.

Increased island danger | वाढीव बेटाला धोका

वाढीव बेटाला धोका

हितेन नाईक , पालघर
सफाळेजवळील वाढीव हे सुमारे २५०० लोकसंख्येचे पूर्ण खाडीच्या मध्यभागी वसलेले बेट. या बेटाच्या सभोवताली असलेल्या संरक्षण बंधाऱ्याजवळून चोरट्या पद्धतीने रेती उत्खनन होत असल्याने संपूर्ण गावाला उधाणाच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तलाठी, पोलीस यांना कळवूनही या रेतीचोरांवर कारवाई केली जात नसल्याने जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी लक्ष घालून आमची घरेदारे वाचवावीत, अशी हाक महिलांनी दिली आहे.
पालघर जिल्ह्यातील सफाळे व वैतरणा रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी पूर्वेला वाढीव, सरावली व वैतीपाडा हे तीन पाडे एका बेटावर वसले आहेत. सुमारे चारशे घरातून २५०० लोक या बेटावर राहत आहेत. शेती, रेती व नोकरीच्या माध्यमातून उदरनिर्वाह चालवीत आहेत. या गावाची प्रमुख समस्या पाणी असून पाणीपुरवठा लाईन अनेक वेळा नादुरूस्त होत असल्याने महिलांना रेल्वे ट्रॅकमधून प्रवास करीत सफाळे येथून पाणी आणावे लागते. आरोग्याबाबत सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असलेल्या या गावात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दर्शनही दुर्लभ होत आहे. अनेक रुग्णांना जीवाला मुकावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे गाव बाराही महिने जगण्यासाठी सतत संघर्ष करताना दिसून येते.

Web Title: Increased island danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.