अतिवृष्टीच्या घटनांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST2021-09-02T04:11:14+5:302021-09-02T04:11:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मोठ्या ब्रेकनंतर मान्सून पुन्हा एकदा परत आला असून, पहिल्याच दणक्यात पावसाने मुंबईकरांना गारद केले ...

अतिवृष्टीच्या घटनांत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मोठ्या ब्रेकनंतर मान्सून पुन्हा एकदा परत आला असून, पहिल्याच दणक्यात पावसाने मुंबईकरांना गारद केले आहे. पुढील तीन ते चार दिवस अशाच स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, गेल्या दहा वर्षांत मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसांच्या घटनांत वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पावसांच्या घटना म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे प्रमाण वाढले आहे. काही वर्षांपूर्वी पाऊस सलग कोसळत होता. मात्र आता पाऊस कमी दिवस पडत असून, कमी दिवसांत अधिक पावसाची नोंद होत आहे. हा पाऊस मुसळधार, अति मुसळधार असा अतिवृष्टी स्वरूपाचा असून, यामुळे मुंबई प्रत्येक पावसाळ्यात पाण्याखाली जात आहे.
२००७ सालापासून तापमानात वाढ होत असून, गेल्या पाच वर्षांत चक्रीवादळासह पावसाच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: वरळी, दादर, कुर्ला, अंधेरीसह बीकेसी अशा ठिकाणी अति मुसळधार पावसाच्या नोंदी होत आहेत. वर्षाला सरासरी या घटनांचे प्रमाण म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या घटनांचे प्रमाण सहा ते चार आहे. गेल्या तीन वर्षांत अतिवृष्टीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे.
२०१७ ते २०२० या चार वर्षात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये स्थिर पण सातत्याने वाढ होताना दिसत असून, अतिवृष्टीच्या सर्वाधिक घटना वरळी - दादर, कुर्ला आणि अंधेरी या पश्चिम आणि मध्य मुंबईत झाल्या आहेत.
--------------------------
गेल्या दहा वर्षात सरासरी पातळीवर झालेला पाऊस
- सहा मुसळधार
- पाच अति मुसळधार
- चार अतिवृष्टीचे दिवस
--------------------------
दरवर्षी मान्सून / पावसाचे प्रमाण
१० टक्के मुसळधार
९ टक्के अति मुसळधार
६ टक्के अतिवृष्टी
--------------------------
एका दिवस
६४.५ मिमी ते ११५.५ मिमी पाऊस म्हणजे मुसळधार
११५.६ ते २०४.४ मिमी पाऊस म्हणजे अति मुसळधार
२०४.५ मिमीपेक्षा अधिक पाऊस म्हणजे अतिवृष्टी
--------------------------
मुंबई : २०२० मधील मोठे पाऊस (मिमी)
२२-२३ सप्टेंबर : २८६.४
३-४ ऑगस्ट : २६८.६
१४-१५ जुलै : १९१.२
४-५ जुलै : २००.८
३-४ जुलै : १५७
--------------------------
वर्षनिहाय चक्रीवादळे
२०१७
१५ ते १७ एप्रिल - बंगालच्या उपसागरात मारुथा
२८ ते ३१ मे - बंगालच्या उपसागरात मोरा
२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर - बंगालच्या उपसागरात ओखी
......................
२०१८
१६ ते २१ मे - अरबी समुद्रात सागर
६ ते १४ ऑक्टोबर - अरबी समुद्रात लुबान
८ ते १३ ऑक्टोबर - बंगालच्या उपसागरात तितली
१० ते १९ नोव्हेंबर - बंगालच्या उपसागरात गज
१३ ते १८ डिसेंबर - बंगालच्या उपसागरात पेथाई
......................
२०१९
२६ एप्रिल ते ४ मे - हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागरात फनी
१० ते १७ जून - अरबी समुद्रात वायू
२२ ते २५ सप्टेंबर - अरबी समुद्रात हिक्का
--------------------------