खादी विक्री केंद्रामुळे अधिकाधिक रोजगारनिर्मिती
By Admin | Updated: January 9, 2017 07:01 IST2017-01-09T07:01:33+5:302017-01-09T07:01:33+5:30
खादी विक्री केंद्रामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, तसेच कारागिरांना विशेष करून, ग्रामीण भागातील महिलांना आपल्या

खादी विक्री केंद्रामुळे अधिकाधिक रोजगारनिर्मिती
मुंबई : खादी विक्री केंद्रामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, तसेच कारागिरांना विशेष करून, ग्रामीण भागातील महिलांना आपल्या उत्पादन विक्रीसाठी सक्षम करता येईल, असे मत केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि माध्यम उद्योग राज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनी स्पष्ट केले.
विलेपार्ले येथे नुकतेच खादी ग्रामोद्योग विकास आयोगाच्या खादी वस्त्र प्रावरणे मिळणाऱ्या पहिल्या विशेष ‘खादी लाउंज’चे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री हरीभाई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. चौधरी म्हणाले की, ‘या खादी विक्री केंद्रामुळे डिझायनर खादी वस्त्र प्रावरणांचे आधुनिक दालन उपलब्ध झाले आहे. यामध्ये महिला आणि पुरुषांसाठी डिझायनर कपडे आहेत. खादी लाउंजची दालने देशातील महानगरात उघडण्यात येणार असून, या मालिकेतील हे पहिले दालन असून, अशा प्रकारची आधुनिक किमती खादी वस्त्रे असणाऱ्या लाउंजचा प्रारंभ दिल्ली आणि जयपूरमध्येही या महिन्याभरात होणार आहे. (प्रतिनिधी)