कल्याण-डोंबिवलीत महिलांवरील गुन्ह्यांत वाढ
By Admin | Updated: February 13, 2015 22:38 IST2015-02-13T22:38:58+5:302015-02-13T22:38:58+5:30
एकंदरीत तुलनेने २०१३ पेक्षा २०१४ या वर्षात कल्याण-डोंबिवली शहरांत सर्वच गुन्ह्यांची संख्या वाढलेली आहे. दोन्ही शहरांच्या कार्यक्षेत्रांत ७ पोलीस ठाणी आहेत

कल्याण-डोंबिवलीत महिलांवरील गुन्ह्यांत वाढ
दिवाकर गोळपकर, कोळसेवाडी
एकंदरीत तुलनेने २०१३ पेक्षा २०१४ या वर्षात कल्याण-डोंबिवली शहरांत सर्वच गुन्ह्यांची संख्या वाढलेली आहे. दोन्ही शहरांच्या कार्यक्षेत्रांत ७ पोलीस ठाणी आहेत. यात कोळसेवाडी, महात्मा फुले, बाजारपेठ, रामनगर, विष्णूनगर, टिळकनगर यांचा प्रामुख्याने समावेश आहे़
गुन्हेगारीच्या आकडेवारीत स्थानिक कोळसेवाडी पोलीस ठाणेही मागे नाही़ या पोलीस ठाणे हद्दीत मंगळसूत्रे व सोनसाखळ्या खेचून नेण्याचे प्रकार वाढल्याने समस्त महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१४ या वर्षात १७ बलात्कार, ३ छेडछाड, ८ अपहरण, ३७ विनयभंग, २७ छळवणूक आणि ५० मंगळसूत्र /सोनसाखळी चोरी असे गुन्हे घडले आहेत. गुन्हेगारी वाढूनही महिला संघटनांसह इतर सामाजिक संघटनांनीही मौन धारण केल्याने पोलिसांचे चांगलेच फावले आहे़