स्वयंसेवक संघाच्या शाखांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 05:07 IST2018-03-15T05:07:14+5:302018-03-15T05:07:14+5:30

देशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांत वाढ झाल्याचा दावा संघाच्या कोकण प्रांताने बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

Increase in Volunteer's Branch | स्वयंसेवक संघाच्या शाखांत वाढ

स्वयंसेवक संघाच्या शाखांत वाढ

मुंबई : देशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांत वाढ झाल्याचा दावा संघाच्या कोकण प्रांताने बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. देशातील सुमारे ९५ टक्के जिल्ह्यांमध्ये संघाचे कार्य पोचल्याने यंदा शाखांत वाढ झाल्याचे संघाचे म्हणणे आहे.
संघाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी ५७ हजार १६५ शाखांच्या संख्येत यावर्षी वाढ होऊन शाखांचा आकडा देशात ५८ हजार ९६८ वर पोहचला आहे. तर गेल्यावर्षी १४ हजार ९८६ साप्ताहिक मिलनांच्या संख्येत यंदा १६ हजार ४०५ पर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय संघमंडळींच्या संख्या ७ हजार ५९४ वरून ७ हजार ९७६ वर पोहचली आहे. त्यातील कोकण प्रांतात ६४८ शाखा, ४९६ साप्ताहिक मिलने आणि ३१ संघमंडळी सुरू आहेत. तर मुंबई महानगरात ३४४ शाखा, २०८ साप्ताहिक मिलने असा कार्यविस्तार आहे.

Web Title: Increase in Volunteer's Branch