ठाणेकरांच्या कचराकरात वाढ

By Admin | Updated: February 14, 2015 22:34 IST2015-02-14T22:34:39+5:302015-02-14T22:34:39+5:30

मालमत्ता करातील छुपीकरवाढ, पाणीपट्टीतील दरवाढी पाठोपाठ आता ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील घनकचरा करात १५ टक्के दरवाढ सुचविली आहे.

Increase in Thanekar's garbage | ठाणेकरांच्या कचराकरात वाढ

ठाणेकरांच्या कचराकरात वाढ

ठाणे : मालमत्ता करातील छुपीकरवाढ, पाणीपट्टीतील दरवाढी पाठोपाठ आता ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील घनकचरा करात १५ टक्के दरवाढ सुचविली आहे. याशिवाय शहरात उद्योग-व्यवसाय करणेही आता महाग होणार असून प्रशासनाने उद्योग करासह जाहिरात शुल्कातही दरवाढ सुचविली आहे.

१ठाणे : उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने आता घनकचरा सेवा शुल्काच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. घनकचरा विभागाचा वार्षिक खर्च हा १४ कोटींच्या आसपास असून उत्पन्न मात्र ८ लाख ३१ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे त्यांनी घनकचरा सेवा शुल्कात १५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत पटलावर ठेवण्यात आला आहे.
२ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला रोज ६५० मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. नागरी घनकचरा नियम २००० नुसार सर्व नागरी संस्थांना घनकचरा इतरत्र टाकण्यास बंदी करणे, कचऱ्याच्या निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण व साठवणूक करणे, घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, कचऱ्याच्या निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण व साठवणूक करणे, कचऱ्याची वाहतूक करणे, पुनर्वापर, शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट आदींची जबाबदारी ही स्थानिक स्वराज्य संस्थेची असते.

३या अनुषंगाने ठाणे महापालिकेने २०१३-१४ या वर्षात कचऱ्यावर १४ कोटी ३१ लाख ५० हजारांचा निधी खर्च केला आहे. परंतु, घनकचरा विभागाला विविध बाबींपासून म्हणजेच कचरा सफाई आकार, मेलेली जनावरे उचलणे, साफसफाई दंड, सेफटी टँक सफाई आदींपासून पालिकेला ८ लाख ३१ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.

मालमत्तेचा प्रकारमासिक सेवा
अनिवासी मालमत्ताशुल्क (")
१) लहान हॉटेल५००
२) मध्यम हॉटेल१०००
३) मोठे १५००
४) तीन तारांकित३०००
५) पंचतारांकित६०००
तबेले३०००
सिनेमागृह३०००
मॉल४५०००

रुग्णालये (जैविक वैद्यकीय
कचरावगळून नागरी कचऱ्याकरिता)
१० बेडपर्यंत४५०
११ ते २५६००
२६ ते ७५७५०
७६ ते १२५१२००
१२६ ते २००१५००
२०१ च्या पुढे१८००

४ उद्योगधंदा परवान्याचा कालावधी एक ते तीन वर्षे असा आहे. कलम ३७६ अन्वये साठा परवाना देण्यात येत असून त्याचा कालावधी एक वर्षाचा आहे. यामध्ये उद्योगधंदा, साठा परवाना मध्ये नावात बदल करणे कमी करणे, साठा मालकाच्या नावात बदल, साठा स्वरूपात बदल, क्षेत्रफळात बदल, कर्मचारी संख्येत बदल, दुय्यम प्रत अदा करणे आदी महत्त्वाच्या बाबींचा यात समावेश होतो. त्यानुसार आता मुदतीत नूतनीकरण न केल्यास विलंब शुल्क म्हणून यापुढे १ ते ३ महिने २५ टक्के, ४ ते ६ महिने ५० टक्के, ७ ते ९ महिने ७५, १० ते १२ महिने १०० आणि पुढील प्रत्येक तीन महिन्यानंतर २५ टक्के आकारण्यात येणार आहेत.
४परंतु, त्यानुसार हे न केल्यास परवाना रद्द केला जाणार आहे. व्यवसायाच्या जागेत स्थलांतर झाल्यास नव्याने परवाना काढायचा झाल्यास परवाना शुल्कात वाढ करण्यात येणार आहे. तात्पुरत्या व्यावसाय परवान्याबाबत १ ते १० दिवस ५०० रुपये, ११ ते १५ दिवस १०००, १६ ते ३० दिवस २०००, ३१ ते ६० दिवस ४०००, ६१ ते ९० दिवस ६००० हजार याप्रमाणे आकारण्यात येणार आहे. तसेच उद्योगधंदा परवाना शुक्लाचे दरही वाढण्यात येणार असून पालिकेने नवे दर प्रस्तावित केले आहेत.

क्षेत्रफळसध्याचे प्रस्तावित
दर
१ ते १०० चौ.फू.--१०००
१०१ ते २५०२५०२०००
२५१ ते ५००५००४०००
५०० ते १०००१०००६०००
१००० ते २५००२०००८०००
२५०१ते ३५००--१००००
३५०१ ते ५०००४०००१२०००
५००१ते६५००--१६०००
६५०१ ते ८०००--२००००
८००१ ते १००००८०००३००००
१० हजार फुटांच्या पुढे१००००४००००

४ठाणे : उद्योगधंदा व साठा परवाना शुल्कामध्ये २० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव येत्या महासभेसमोर प्रशासनाने आणला आहे.

४ठाणे : शहरात लागणाऱ्या होर्डिंग्ज, बॅनरबाजी, दुकानांवरील जाहिराती आदींसह इतर जाहिरातींवरील दर वाढविण्याचा निश्चय ठाणे महापालिकेने केला आहे. त्यानुसार, येत्या आर्थिक वर्षात जाहिरात दरात १० टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. परंतु, ही दरवाढ मुंबई महापालिकेपेक्षा कमी असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
४उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने अखेर आता जाहिरातींचे दरही वाढविण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने केला आहे. त्यानुसार, जाहिरात फलक (लहान) यांचे प्रकाशित दर १ चौमीपर्यंत १८८ वरून ९४१ रुपये असणार आहेत. तसेच पुढील प्रत्येक चौमीसाठी १६३ ऐवजी ७२० रुपये आकारले जाणार आहेत. मार्ग श्रेणी अ मध्ये १ चौमीपर्यंत ८७६, पुढील प्रत्येक चौमीसाठी ६३७ रुपये आकारले जाणार आहेत.

४ भिंतींवरील जाहिराती यांचे दर १ चौमीपर्यंत २५५, बसथांब्यांवरील जाहिरातीचे प्रकाशित दर १ चौमीपर्यंत ८७६, दिव्यावरील खांब्याचे फलक ३० बाय ४० साठी १४४ ऐवजी ६७४, दुकानावरील जाहिरातीचे फलक १ चौमीपर्यंत ५८१ असणार आहेत.
४होर्र्डिंग्ज (स्काय साइज) ० ते २०० चौमी ९१ रुपये, वाहनावर जाहिरातीचे दर १ ते २ चौमीपर्यंत १०६ ऐवजी ८७६ रुपये यानुसार आकारले जाणार आहेत. चलत जाहिरातीसाठी फीच्या १० टक्के जादा रक्कम आकारण्यात येणार आहे. दुकानाच्या नावाव्यतिरिक्त दुकानाच्या फलकावर उत्पादकाची जाहिरात केली असल्यास त्यास जाहिरात फी आकारण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

Web Title: Increase in Thanekar's garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.