Join us  

...तर ठाकरे सरकारचे तब्बल २८ हजार कोटी वाचणार; मुख्यमंत्री 'ती' मागणी मान्य करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 4:09 AM

निवृत्तीचे वय सर्वांसाठी ६० वर्षे केल्यास दोन वर्षांसाठीचे निवृत्ती लाभापोेटीचे शासनाचे २८ हजार कोटी रुपये वाचतील आणि ती रक्कम राज्याच्या विकासासाठी वापरता येईल. सध्याच्या संकटग्रस्त परिस्थितीत अनुभवी कर्मचारी, अधिकारी उपलब्ध होतील, असा तर्क महासंघाने दिला आहे.

मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करण्याची मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. ही मागणी मान्य करण्याची विनंती त्यांच्याकडून करण्यात आली आहे. सध्या फक्त गट ड च्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय हे ६० वर्षे आहे.निवृत्तीचे वय सर्वांसाठी ६० वर्षे केल्यास दोन वर्षांसाठीचे निवृत्ती लाभापोेटीचे शासनाचे २८ हजार कोटी रुपये वाचतील आणि ती रक्कम राज्याच्या विकासासाठी वापरता येईल. सध्याच्या संकटग्रस्त परिस्थितीत अनुभवी कर्मचारी, अधिकारी उपलब्ध होतील, असा तर्क महासंघाने दिला आहे.आज माणसाचे सरासरी आयुर्मान हे पूर्वीच्या तुलनेत आठ ते दहा वर्षांनी वाढले असल्याचे पाहायला मिळत आहे. वयाच्या साठाव्या वर्षीही कर्मचारी पूर्वी इतक्याच उत्साहाने काम करू शकतात. देशातील २२ राज्यांमध्ये निवृत्तीचे वय हे ६० वर्षेच आहे, याकडे महासंघाने लक्ष वेधले आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरे